Success Story: पुणेकर तरुणाची कमाल! मातीशिवाय उगवलं 'केशर', महिन्याला लाखोंची कमाई

एका पुणेकर तरूणाने अवघ्या १६० वर्ग मीटर जागेत केशरची शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे यातून हा तरूण लाखो रुपयांची कमाई करत आहे.
Farming
FarmingSakal
Updated on

Farming Of Saffron: केशरची शेती म्हटलं की उत्पादनासाठी लागणारा भलामोठा खर्च समोर येतो. एवढेच नाही तर केशरच्या शेती ही विशिष्ट ठिकाणीच होऊ शकते, असे अनेकांना वाटते. परंतु, एका पुणेकर तरूणाने हे सर्व तर्क खोटे ठरवत अवघ्या १६० वर्ग मीटर जागेत केशरची शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे यातून हा तरूण लाखो रुपयांची कमाई करत आहे.

सॉफ्टवेअर इंजिनअर असलेल्या शैलेश मोडक या पुणेकर तरुणाने केशरची हटके शेती केली आहे. केशरची शेती प्रामुख्याने काश्मिरमध्ये होते. बाजारात प्रती किलो केशरची किंमत ३ लाख रुपये आहे. मात्र, शैलेशने मोबाइल कंटेनरमध्ये केलेल्या केशरच्या शेतीमुळे त्याचे कौतुक होत आहे.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

शैलेशने १६० वर्ग मीटर जागेत केशरची शेती सुरू केली आहे. यासाठी त्याने खास तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. शैलेशने सांगितले की, 'केशरची शेती करण्यासाठी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली. यासाठी बियाणे काश्मिरमधून खरेदी केले.' बाजारात १ किलो केशरसाठी तब्बल ३ लाख रुपये भाव आहे. अगदी छोट्या जागेत केलेल्या या शेतीतून त्याची मोठी कमाई होतेय.

Farming
Tesla Cybertruck: कन्फर्म! भारतीय रस्त्यांवर दिसणार टेस्लाचा सायबरट्रक, ८००Km रेंज अन् बरचं काही

शैलेशने माहिती दिली की, केशरच्या शेतीसाठी Aeroponic Technology चा वापर करण्यात आले आहे. शिपिंग कंटेनरमध्ये केशरची झाडे लावली आहेत. या टेक्नोलॉजीचा वापर करून मातीशिवाय शेती करणे सहज शक्य आहे. शैलेशने याआधी भाज्या आणि स्ट्रॉबेरीची देखील शेती केली आहे. यात यश मिळाल्यानंतर केशरची शेती करण्याचा निर्णय घेतला. या शेतीमुळे आता लाखो रुपयांचे कमाईचा मार्ग निर्माण झाला आहे.

हेही वाचा: Amazon Sale: स्वस्तात मस्त! अवघ्या ९९९ रुपयात मिळतायत ब्रँडेड इयरबड्स, फीचर्स खूपच जबरदस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.