बाजारात लवकरच येणार Sony ची इलेक्ट्रिक कार! ग्राहकांसाठी आणखीन एक पर्याय

सोनी बाजारात आणणार इलेक्ट्रिक कार
Sony Electric Car
Sony Electric Caresakal
Updated on

नवी दिल्ली : तुम्ही बाजारात सोनीची (Sony)टीव्ही, हेडफोन किंवा कॅमेरा जरुर पाहिला असेल. लवकरच तुम्हाला जर या ब्रँडची इलेक्ट्रिक कार दिसली तर आश्चर्य वाटू देऊ नका. कंपनी होंडा मोटर्सबरोबर (Honda Motors) आता इलेक्ट्रिक वाहने बनवून विकणार आहे. त्यासाठी दोन्ही कंपनीने करार केला आहे. (Sony Joins Hand With Honda Motors For Electric Vehicle)

Sony Electric Car
Honda Activa होणार इलेक्ट्रिक स्कूटर? काय असतील फिचर्स

२०२५ पर्यंत येईल पहिली कार

सोनीने म्हटले आहे, की दोन्ही कंपन्या मिळून जे इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) बनवणार आहे, त्याचे पहिले माॅडल २०२५ पर्यंत बाजारात येईल. यात वाहनांच्या निर्मितीचे काम होंडा पाहिल, दुसरीकडे मोबिलिटी सर्व्हिस प्लॅटफाॅर्म सोनी बनवील. सोनी अन्य तंत्रज्ञान भागीदारांबरोबर काम करण्याचे नियोजन करित आहे. ज्यात कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाला केवळ गाडी नाही तर एक मनोरंजनाचे साधन म्हणून ही विकसित करण्यास मदत करु शकेल. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला सीईएस २०२२ मध्ये आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही प्रोटोटाईप व्हिजिन-एस ०२ आणि इलेक्ट्रिक सेदान व्हिजिन-एस ०१ ला सादर केले होते.

Sony Electric Car
जमशेदजी टाटा जयंती : Ratan Tata झाले भावूक म्हणाले...

या वर्षी जानेवारीत सोनी ग्रुप काॅर्पोरेशनचे (Sony Group Corporation) अध्यक्ष केनिचिरो योशिदा यांनी एक नवीन कंपनी 'सोनी मोबिलिटी' (Sony Mobility) स्थापन्याची घोषणा केली होती. नवीन इलेक्ट्रिक वाहने होंडा (Honda) बरोबर याच संयुक्त भागीदारीतून बनवले जाईल. या व्यतिरिक्त सोनीचा प्रयत्न ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये आणखीन शक्यता शोधण्यासाठी अॅपल, एलजी इलेक्ट्राॅनिक्स आणि फाॅक्सऑनबरोबर हात मिळविण्याचेही आहे. होंडाचे म्हणणे आहे, की सोनी आणि त्यांच्यात काही सारखेपणा आहे. त्यामुळे जे नवीन वाहन असेल ते इनोव्हेशनच्या बाबत सर्वात पुढे असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()