Playstation 5 : सोनी कंपनीचे गेमिंग कन्सोल हे जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्लेस्टेशन 5 या कन्सोलने लाँच होताच मोठी लोकप्रियता मिळवली होती. लोकांनी अक्षरशः रांगेत उभं राहून हे कन्सोल खरेदी केले होते. आता कंपनीने या कन्सोलचे तब्बल चार कोटी युनिट्स विकल्याचा दावा केला आहे.
"आम्ही 2019 साली पीएस5 ची घोषणा केली होती. त्यानंतर 2020 साली नोव्हेंबरमध्ये ते लाँच करण्यात आलं. कोव्हिडमुळे सगळीकडील बाजारपेठ ठप्प असूनही, पीएस5 वेळेवर यूजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या टीमने आणि पार्टनर्सनी मेहनत घेतली. यामुळेच हा टप्पा गाठणं शक्य झालं", असं कंपनीचे अध्यक्ष जिम रायन यांनी म्हटलं आहे.
इनोव्हेटिव्ह इंडी गेम्सपासून एएए कंपनीच्या ब्लॉकबस्टर गेम्सपर्यंत, पीएस5 वर अशा 2,500 हून अधिक गेम्स उपलब्ध आहेत. यावर्षीच्या मार्च तिमाहीत 6.3 दशलक्ष पीएस5 युनिट्स विकले गेल्याचं जिम यांनी सांगितलं आहे. (Online Gaming)
दरम्यान, सोनीच्या पीएस5 गेमिंग कन्सोलच्या डिस्क एडिशनवर सध्या मोठा डिस्काउंट मिळत आहे. 54,990 रुपयांना उपलब्ध असणारे PS5 तुम्ही 47,490 रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजेच, यावर तब्बल 7,500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. 25 जुलैपासून ही ऑफर सुरू झाली असून, 7 ऑगस्टपर्यंत याचा लाभ घेता येईल.
या ऑफरमुळे आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीमध्ये प्लेस्टेशन 5 विकत घेता येणार आहे. ही ऑफर कोणत्याही प्रकारच्या पेमेंटवर उपलब्ध आहे. तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स, क्रोमा, विजय सेल्स अशा कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही PS5 घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.