Open AI Sora : फक्त स्क्रिप्ट एंटर करा, अन् सिनेमा होईल तयार! 'ओपन एआय'ने केलं खास व्हिडिओ बनवणारं टूल

Sora AI Model : 'सोरा' विविध प्रकारचे कॅरेक्टर्स, मोशन्स, सब्जेक्टच्या डीटेल्स आणि बॅकग्राऊंड देखील तयार करू शकतं. कितीही जटिल व्हिडिओ असला, तरी तो बनवण्यास सोरा सक्षम आहे.
Open AI Sora
Open AI SoraeSakal
Updated on

Open AI new Video Generation tool Sora : एआय म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं - चॅटजीपीटी! ओपनएआय कंपनीने बनवलेला हा चॅटबॉट तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो, तसंच टेक्स्ट टू फोटो जनरेशन देखील करतो. मात्र, याच कंपनीने आता एक नवीन एआय मॉडेल सादर केलं आहे; जे टेक्स्ट कमांड वाचून चक्क व्हिडिओ तयार करणार आहे.

Sora असं नाव असणारे हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मॉडेल सध्या टेक्स् वाचून एका मिनिटाचे व्हिडिओ बनवू शकते. हे मॉडेल रिसर्च स्टेजमध्ये असून, अद्याप कोणत्याही प्रॉडक्टसोबत लाँच केलेलं नाही. कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. सध्या सोरा हे केवळ ठराविक लोकांना उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. (ChatGPT Sora)

लोकांकडून मागवले इनपुट

सॅम अल्टमन (Sam Altman) यांनी आपल्या पोस्टमध्ये सोरा कशाप्रकारे काम करतं हे दाखवण्यासाठी मुख्य वेबसाईटची लिंक दिली. सोबतच त्यांनी लोकांना देखील आवाहन केलं होतं. "तुम्हाला जो व्हिडिओ पहायचा आहे, त्याचं कॅप्शन लिहून पाठवा.. आम्ही त्यानुसाार व्हिडिओ बनवायला सुरू करू" असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. (How to use Sora)

Open AI Sora
AI Boyfriend : 'गप्पा मारुन थकत नाही, समजूनही घेतो..'; मुली देतायत तरुणांपेक्षा एआय बॉयफ्रेंडला पसंती

यावेळी त्यांनी काही यूजर्सच्या इनपुटनुसार त्वरित व्हिडिओही बनवून दाखवले. 'सोरा' विविध प्रकारचे कॅरेक्टर्स, मोशन्स, सब्जेक्टच्या डीटेल्स आणि बॅकग्राऊंड देखील तयार करू शकतं. कितीही जटिल व्हिडिओ असला, तरी तो बनवण्यास सोरा सक्षम आहे. एवढंच नाही, तर एकाच व्हिडिओमध्ये विविध अँगल्स आणि शॉट्स देखील सोरा बनवू शकतं; अशी माहिती ओपन एआयने दिली आहे. (Sora AI Tool)

संपूर्ण मूव्ही बनवता येणार?

अद्याप सोरा रिसर्च स्टेजमध्ये आहे, त्यामुळे त्यामध्ये केवळ एका मिनिटांचे व्हिडिओ तयार होतात. मात्र, लाँच झाल्यानंतर देखील तुकड्या-तुकड्यांमध्ये शॉट्सची माहिती देऊन एक संपूर्ण मूव्ही सोराकडून तयार करून घेणं अशक्य नसेल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. यामुळे केवळ एक व्यक्ती एका ठिकाणी बसून एक संपूर्ण चित्रपट बनवू शकेल, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Open AI Sora
Apple AI : 'एआय'च्या शर्यतीत अ‍ॅपलची बाजी? एका वर्षात खरेदी केल्या तब्बल 30 स्टार्टअप कंपन्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.