Space Wedding : आता चंद्र-ताऱ्यांच्या साक्षीने करा अंतराळात लग्न; फक्त 'इतका' येईल खर्च...

स्पेस पर्स्पेक्टिव्ह या स्पेस ट्रॅव्हल कंपनीने ही सुविधा उपलब्ध केली आहे.
Space Wedding
Space WeddingEsakal
Updated on

प्रेमात असताना कितीही चंद्र-तारे आणून देण्याचे वायदे आपल्या प्रेयसी वा प्रियकराला दिले, तरीही प्रत्यक्षात ते शक्य नसतं. मात्र, आता तुम्हाला याच चंद्राच्या साक्षीने थेट अंतराळात जाऊन लग्न करता येणार आहे. स्पेस पर्स्पेक्टिव्ह या स्पेस ट्रॅव्हल कंपनीने ही सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे आता डेस्टिनेशन वेडिंगनंतर चक्क 'स्पेस वेडिंग'चा ट्रेंड सुरू होणार आहे.

'स्पेस वेडिंग' लोकप्रिय

कंपनीच्या को-फाऊंडर जेन पॉइंटर यांनी सांगितले, की अंतराळात लग्न करण्यासाठी (Space Wedding) कित्येक लोक उत्सुक आहेत. यासाठी एक मोठी वेटिंग लिस्ट तयार आहे. त्यामुळे आता अंतराळात लग्न करणारं पहिलं कपल कोण ठरेल हे पाहण्यासाठी आपणही उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या.

असं जाणार अंतराळात

लग्नासाठी आलेल्या कपलला अंतराळात नेण्यासाठी कंपनीने स्पेस बलून्स (Space Balloons) तयार केले आहेत. हायड्रोजनने भरलेले हे बलून्स 'नेपच्यून' नावाच्या स्पेस कॅप्सुलला अंतराळात नेतील. याचा वेग १९ किलोमीटर प्रतितास एवढा असेल. त्यामुळे हे एखाद्या विमानात बसल्याप्रमाणेच सुरक्षित असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

Space Wedding
Wedding Look : गर्ल्स लग्नात कडक दिसायचंय ना? मग हे लूक ट्राय कराच

स्पेस पर्स्पेक्टिव्ह कंपनीने वापरलेले हे तंत्रज्ञान गेल्या कित्येक वर्षांपासून नासा आणि इतर सरकारी अंतराळ संस्थांकडून वापरण्यात येत आहे. अंतराळात रिसर्च टेलिस्कोप आणि अन्य उपकरणे नेण्यासाठी याचा वापर करण्यात येतो.

किती आहे तिकीट?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी एका व्यक्तीचा खर्च (Space Wedding Cost) १,२५,००० डॉलर्स, म्हणजेच सुमारे एक कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. स्पेस पर्स्पेक्टिव्ह कंपनीच्या वेबसाईटवर (Space Perspective website) तुम्ही यासाठी नोंदणी करू शकता. २०२४ च्या शेवटी ही सुविधा सुरू होईल. यासाठी आतापासूनच मोठी वेटिंग लिस्ट तयार झाली आहे.

Space Wedding
Wedding Ceremony : वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी 'लालपरी'ला सर्वाधिक पसंती; दीडशे गाड्या आरक्षित, 20 लाखांचं उत्पन्न

कॅप्सुलमध्ये या सुविधा

या स्पेस कॅप्सुलमध्ये रिफ्रेशमेंट्स, वायफाय, टॉयलेट आणि एक फ्लोटिंग लाउंज अशा विविध सुविधा मिळतील. ज्यामुळे, आतील व्यक्तींचा प्रवास अगदी आरामदायी होणार आहे.

Space Wedding
NASA : 2046 मध्ये 'व्हॅलेंटाईन डे'ला जग नष्ट होणार? 'नासा'नं दिला धोक्याचा इशारा, जाणून घ्या कारण

दिसणार सुंदर दृश्य

कंपनीचे लीड डेव्हलपमंट इंजिनिअर व्हिन्सेंट बॅचेट यांनी सांगितले, की नेपच्यून या स्पेस कॅप्सुलला मोठी खिडकी असेल. आतापर्यंत अवकाशात पाठवण्यात आलेल्या कोणत्याही कॅप्सुलला नव्हती, एवढी मोठी ही खिडकी असेल. यामध्ये हायपर रझिस्टंट मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच सूर्यकिरणांपासून बचावासाठी विशेष अँटी यूव्ही लेअर लावण्यात आली आहे. यामुळे अंतराळातून पृथ्वीचा सुंदर नजारा पाहता येणार आहे.

असं म्हणतात, की लग्न (Wedding in Space) एकदाच होतं. त्यामुळे आपलं लग्न जास्तीत जास्त अविस्मरणीय ठरावं असा कित्येकांचा प्रयत्न असतो. यासाठी कुणी डेस्टिनेशन वेडिंग करतं, तर कोणी बीच वेडिंग. तुम्हालाही असंच हटके लग्न करायचं असेल, तर स्पेस वेडिंगचा हा पर्याय नक्कीच ट्राय करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.