Spacecraft re-entry into Earth from space : अमेरिकेतील खासगी संस्थेचं एक अंतराळयान नुकतंच पृथ्वीवर परत आलं. Varda Space Industries या संस्थेने यात एक वेगळा प्रयोग केला होता. अंतराळातून पृथ्वीपर्यंतचा प्रवास रेकॉर्ड करण्यासाठी कंपनीने या स्पेसक्राफ्टवर एक खास कॅमेरा बसवला होता. या कॅमेऱ्याने टिपलेली दृश्ये आता समोर आली आहेत.
पृथ्वीच्या खालच्या कक्षेतून (LEO) हे यान पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात आलं. या कक्षेपासून ते पॅराशूट उघडून जमीनीवर उतरेपर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ संस्थेने शेअर केला आहे. अवघ्या पाचच मिनिटांमध्ये हे यान झपाट्याने पृथ्वीवर येतं. यावेळी अवकाशातून आपला सुंदर निळा ग्रह अगदीच आकर्षक दिसत आहे. (Spacecraft Video)
वर्डा स्पेस इंडस्ट्रीजने आपल्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. "आम्ही अवकाशात औषध उत्पादन घेतो. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर जी औषधं तयार करणं शक्य नाहीत, ती अवकाशात तयार करता येतात. औषध उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या केमिकल प्रोसेसमध्ये ग्रॅव्हिटीचा मोठा प्रभाव पडतो" असं कंपनीचे सीईओ विल ब्रुई यांनी सांगितलं.
हे यान अवकाशात नेणे आणि परत आणणे यासाठी वर्डाने 'रॉकेट लॅब' (Rocketlab) या कंपनीची मदत घेतली होती. "ही मोहीम आमच्या आणि वर्डाच्या टीममधील उत्कृष्ट समन्वय दाखवणारी ठरली. कॅप्सुल अवकाशात नेणे, तिथे औषध तयार करणे आणि ती पुन्हा पृथ्वीवर आणणे - या सगळ्या गोष्टी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्या." असं रॉकेटलॅबचे सीईओ पीटर बेक यांनी म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.