Aditya-L1 Mission: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी लॉन्च करण्यात आलेल्या आदित्य एल १ मोहिमेबाबत इस्रोनं मोठी आपडेट दिली आहे. त्यानुसार, या यानानं यशस्वीरित्या पृथ्वीचं प्रभाव क्षेत्र ओलांडून पृथ्वीपासून ९ लाख किमीपेक्षा अधिक अंतराचा टप्पा पार केला आहे. (Spacecraft travelled beyond distance 9.2 lakh kilometres from Earth successfully escaping sphere influence)
इस्रोच्या माहितीनुसार, पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राला भेदून आदित्य मिशनच्या अंतराळयानं मोठी कामगिरी केली आहे. पृथ्वीपासून हे यान आता ९ लाख किमीपेक्षा अधिक अंतरावर पोहोचलं आहे. आता हे यान सूर्य-पृथ्वीच्या लँग्रेज पॉईंट वन अर्थात L1 पॉईंटचा मार्ग शोधत आहे.
भारताच्या अंतराळ मोहिमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संसोधन संस्थेन अर्थात इस्रोनं दुसऱ्यांना एक अंतराळयानं पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राच्याबाहेर पाठवलं आहे. यापूर्वी मंगळ ऑर्बिटर मोहिमेवेळी त्या यानानं पृथ्वीचं प्रभावक्षेत्र भेदलं होतं. एकूणच आता आदित्य L1 मिशनमधील यान लवकरच आपल्या इच्छित लक्ष्यापर्यंत पोहोचणार आहे. (Latest Marathi News)
PSLV C-57 या लॉन्चरच्या साहाय्यानं आदित्य एल १ कक्षेमध्ये सोडण्यात आलं आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या L1 लॅग्रेंज पॉईंटजवळ हे यान स्थिरावेल. हा पॉईंट पृथ्वीपासून साधारण दीड मिलियन किलोमीटर अंतरावर आहे.
सूर्य आणि त्याच्या आसपासच्या वातावरणाचा अभ्यास करणं, यामुळं शक्य होणार आहे. या अभ्यासादरम्यान ग्रहणाचाही अडथळा येऊ शकणार नाही. हे यान साधारणपणे चार महिन्यांमध्ये आपल्या नियोजित स्थळी पोहोचेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
VELC - व्हिसिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ
SUIT - सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप
SoLEXS - सोलर लो एनर्जी एक्स रे स्पेक्ट्रोमीटर
HEL1OS - हाय एनर्जी एल १ ऑर्बिटिंग एक्स रे स्पेक्ट्रोमीटर
ASPEX - आदित्य सोलर विंग पार्टिकल एक्सपेरिमेंट
PAPA - प्लाझ्मा अॅनलायझर पॅकेज फॉर आदित्य
अॅडव्हान्स ट्राय अॅक्सिअल हाय रिझोल्यूशन डिजिटल मॅग्नेटोमीटर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.