स्पॅम कॉलपासून मिळेल सुटका, फोनमध्ये लगेच चालू करा 'हे' फीचर

Spam Call: जर तुम्हाला स्पॅम कॉलचा त्रास होत असेल तर तुमच्या फोनमध्ये आजच ही सेटिंग सुरू करा.
Samp Call
Samp CallSakal
Updated on

Spam Call: अनेक वेळा असे होते की तुम्ही महत्त्वाच्या कामात व्यस्त असता आणि अचानक तुम्हाला स्पॅम कॉल येतो. ज्यामुळे कामात अडथला निर्माण होतो. स्पॅम कॉल दिवसातून एकदाच येतात असे नाही. कधी-कधी हे कॉल दिवसातून ४ ते ५ वेळा येतात. काहीवेळा ते कर्जाच्या नावाने कॉल करतील, तर काहीवेळा ते क्रेडिट कार्डवरील विशेष ऑफरबद्दल कॉल करतील. हे स्पॅम कॉल टाळण्यासाठी यूजर्स फोनमधील सेटिंगमध्ये बदल करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्पॅम कॉलच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया ही सेटिंग कोणती आहे.

स्पॅम कॉल कसे ब्लॉक करावे

  • स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी अँड्रॉइड यूजर्संना सेटिंगमध्ये बदल करावे लागतील. त्यानंतर स्पॅम कॉल्स आपोआप ब्लॉक होतील.

  • सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनच्या कॉलिंग ॲपवर जावे लागेल. तेथे तुम्हाला तीन डॉट दिसतील. तुम्हाला या तीन डॉटवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला सेटिंगवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर कॉलर आयडी आणि स्पॅमचा पर्याय तुमच्यासमोर येईल, त्यावर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला दोन पर्याय मिळतील. तुम्हाला स्पॅम क्रमांक ओळखण्यासाठी सेटिंग चालू करावी लागेल. त्यानंतर स्पॅम कॉल फिल्टरचा पर्याय चालू करावा. यानंतर तुम्हाला स्पॅम कॉल येणार नाही.

Samp Call
Raksha Bandhan Gifts For Sister : यंदाच्या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला गिफ्ट करा 'हे' जगात भारी गॅजेट्स, आजच करा ऑर्डर

पुढील गोष्टी ठेवा लक्षात

फोनमधील सेटिंग बदल्यानंतर स्पॅम कॉल ऑटोमॅटिक ब्लॉक होतो. परंतु जो नंबर पहिलेच स्पॅम मार्क नाही ,फोनमध्ये तो नंबर ब्लॉक होणार नाही. याशिवाय, हे लक्षात ठेवा की ही सेटिंग चालू केल्यानंतर अनेक महत्त्वाचे कॉल्स ब्लॉक होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.