SpinOK Virus : तब्बल १०० हून अधिक अ‍ॅप्समध्ये मिळाला हा व्हायरस, फोनमध्ये आला की विषयच संपला!

जगभरात सुमारे ४० कोटीहून अधिक वेळा याला डाऊनलोड केलं गेलं आहे.
SpinOK Virus
SpinOK VirusEsakal
Updated on

स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअरचे जसे वेळोवेळी अपडेट येत असतात, तसंच स्पॅमर्स देखील आपले व्हायरस अपडेट करत असतात. त्यामुळेच फोन हॅक करणारे मालवेअर (Smartphone Virus) वारंवार समोर येत असतात. आताही स्पिन ओके नावाच्या एका व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे गुगलच्या प्लेस्टोअरवरील सुमारे १०० हून अधिक अ‍ॅप्समध्ये हा व्हायरस आढळला आहे.

सिक्युरिटी रिसर्च करणाऱ्या डॉ. वेब या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. प्लेस्टोअरवरील अ‍ॅप्स (Google PlayStore) आपण सुरक्षित असल्याचं समजून डाऊनलोड करतो. मात्र, अशा अ‍ॅप्समधूनच हा व्हायरस येत असल्यामुळे जगभरात सुमारे ४० कोटीहून अधिक वेळा याला डाऊनलोड केलं गेलं आहे.

SpinOK Virus
Daam Virus : सावधान! थेट कॉल लॉग आणि कॅमेरा हॅक करतोय हा व्हायरस, केंद्रीय यंत्रणांनी दिला धोक्याचा इशारा

किती आहे धोका?

हा व्हायरस (SpinOK Virus) तुमच्या स्मार्टफोनमधील डेटा चोरी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. एखादी जाहिरात किंवा मिनि गेमच्या स्वरूपात हा व्हायरस दिसतो. यावर क्लिक केल्यानंतर हा मालवेअर तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतो. यानंतर तुमची खासगी माहिती हा व्हायरस विदेशात पाठवतो. काही प्रकरणांमध्ये संपूर्ण फोनच रिमोट मोडवर गेल्याचं दिसून आलं आहे. यामुळे विदेशात बसलेले हॅकर्स तुमचा फोन वापरू शकतात.

कोणत्या अ‍ॅप्समध्ये आढळला?

प्लेस्टोअरवरील सुमारे १०० हून अधिक अ‍ॅप्समध्ये हा व्हायरस आढळला आहे. यामध्ये काही लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. झाप्या (Zapya) हे फाईल ट्रान्सफर करणारे अ‍ॅप, नॉईज (Noizz) हे व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅप, कॅशझीन (Cashzine) हे मनी रिवॉर्ड अ‍ॅप, फिझो नॉव्हेल (Fizzo Novel) हे ऑफलाईन रीडिंग अ‍ॅप, ब्युगो (Biugo) हे व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅप, यासोबतच कॅशईएम (CashEM), एमव्हीबिट (MVBit), व्हीफ्लाय (VFly) अशा इतर अ‍ॅप्समध्येही हा मालवेअर (SpinOK Malware) आढळला आहे.

SpinOK Virus
पुण्यात इथे मिळतील सर्वात स्वस्त Mobile Accesories.. एक फेरफटका नक्की मारा

अशी घ्या खबरदारी

मालवेअर आढळल्यानंतर या अ‍ॅप्सना गुगल प्लेवरून हटवण्यात आलं आहे. मात्र तुम्ही यापूर्वीच यांपैकी एखादे अ‍ॅप इन्स्टॉल केले असेल, तर तातडीने ते अनइन्स्टॉल करण्याची गरज आहे. तसंच, यानंतर शक्य तितक्या लवकर स्मार्टफोन अपडेट करणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरची मदतही घेऊ शकता.

SpinOK Virus
Smartphone Tips : वारंवार फोन होतोय ओव्हरहीट? या टिप्स वापरून लगेच करा कूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.