फेसबुक मेसेंजरवर करा 'बिल स्प्लिट'; एका क्लिकवर होईल पेमेंट

Split Payments on FB Messenger
Split Payments on FB MessengerGoogle
Updated on

Split Payments on FB Messenger : मेटा (Meta) कंपनीकडून त्यांच्या फेसबुक मेसेंजरमध्ये (FB Messenger) गुगल पे सारखे एक भन्नाट फीचर देण्यात आले आहे, जे स्प्लिट पेमेंट्स म्हणून ओळखले जाईल. नवीन फीचरच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये पैशाचे व्यवहार सहज करू शकतील. म्हणजेच वापरकर्ते एकाच वेळी अनेक लोकांना समान रक्कम ट्रान्सफर करु शकणार आहेत. अलीकडेच Google Pay मध्ये स्प्लिट पेमेंट फीचर देण्यात आले आहे. यामुळे रेस्टॉरंट बिल आणि घरभाडे देण्यास मदत होईल, असा कंपनीचा दावा आहे.

स्प्लिट पेमेंट फीचर कसे काम करेल

फेसबुक मेसेंजरचे स्प्लिट फीचर वापरण्याची पद्धत अगदी सोपी आहे. यासाठी वापरकर्त्यांना ग्रुप चॅटच्या गेट स्टार्ट बटणावर क्लिक करावे लागेल किंवा तुम्हाला मेसेंजर अॅपच्या पेमेंट हब बटणावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही ग्रुपमधील लोकांमध्ये पैसे वाटून घेऊ शकाल. समजा जर तुम्हाला 12,000 रुपये 5 लोकांमध्ये समान प्रमाणात वाटायचे असतील, तर वापरकर्ते कॉन्टॅक्ट लिस्टमधून लोकांची नावे निवडून 2500 रुपये प्रत्येकी असे समान प्रमाणात ट्रान्सफर करू शकतील. त्यामुळे एका क्लिकवर तुमच्या सगळ्या मित्रांना पैसे पोहच होतील.

लवकरच इतर देशांमध्ये लागू होणार

सध्या, हे फीचर यूएससाठी देण्यात आले आहे, ज्याची टेस्टींग पूर्ण झाली असून हे फीचर भारतात लागू केले जाणार नाही. तसेच, इतर देशांमध्ये मेटा हे फीचर कधी लागू करत आहे याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

Split Payments on FB Messenger
4GB रॅमसह येतोय रेडमी 10; मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स

आणखी नवं काय?

मेटा कंपनीच्या मालकीच्या Facebook मेसेंजरला पुढील आठवड्यात नवीन अपडेट मिळणार आहे जे वापरकर्त्यांना त्यांच्या मित्रांमध्ये बिल स्प्लिट करण्यास मदत करणार आहे. टेक जायंट कंपनीवे अलीकडेच त्याच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म, मेसेंजरमध्ये नवीन ग्रुप इफेक्ट्स सारख्या काही नवीन फीचर्सचा समावेश केला आहे.

हे नवीन फीचर मेसेंजर आणि इंस्टाग्राम व्हिडिओ कॉलमध्ये ग्रुपमधील सर्वांना सेम इफेक्ट वापरता येतात. कंपनीने मेसेंजर आणि इंस्टाग्राम व्हिडिओ कॉलसाठी नवीन कस्टम ग्रुप इफेक्ट्स आणण्यासाठी चार निर्मात्यांसोबत भागीदारी केली.

Split Payments on FB Messenger
IIT खरगपूरमध्ये विक्रमी प्लेसमेंट; विद्यार्थ्याला 2.40 कोटींच पॅकेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.