प्रवाशांनो, एसटीची तक्रार करा आता ‘चॅट बॉट’वर; ‘एआय’च्या वापरावर भर

Report ST Complaint now on 'AI Chatbot': महामंडळाच्या संकेतस्थळावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वाढता वापर बघून प्रवाशांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
AI Chat chatbot
AI Chat chatbotSakal
Updated on

अखिलेश गणवीर

AI Chatbot: एसटी वेळेवर येणार? गावात आज पोहोचणार की नाही? बससंख्या, बसेसचे नियोजन, आगाराची स्थिती, तिकिटाचे आरक्षण, तिकीट दर असे एक नव्हे अनेक प्रश्न विचारण्याची आणि तक्रार करण्याची सुविधा राज्यात एसटी महामंडळाने ‘चॅट बॉट’च्या माध्यमातून प्रवाशांना करून दिली आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वाढता वापर बघून प्रवाशांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

‘वेलकम टू द महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट सर्विस सपोर्ट सिस्टिम’, ‘हाऊ मे आय हेल्प यू’ असा प्रश्न महामंडळाच्या संकेतस्थळावर विचारल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. कारण महामंडळाने आपल्या संकेतस्थळावर ‘एमएसआरटीसी चॅट बॉट’ नावाने प्रवाशांच्या तक्रारीसाठी विशेष सेवा सुरू केली आहे. राज्यभरात प्रवाशांच्या

प्रवाशांनो, एसटीची तक्रार करा आता ‘चॅट बॉट’वर

तक्रारीत वाढ झाली आहे. पूर्वी आगारातच जाऊन लेखी तक्रार करावी लागायची. मात्र, आता स्मार्टफोन आणि ऑनलाइनचा वाढता वापर लक्षात घेऊन महामंडळाने तक्रारीसाठी ही सेवा सुरू केली आहे. ही तक्रार थेट संबंधित विभाग प्रमुखांकडे यामाध्यमातून जाणार आहे. त्याचे समाधान झाले की नाही, प्रवाशांना त्याची अपडेट वेळोवेळी मिळेल. आधी ई-मेलच्या माध्यमातूनही तक्रीरीची सुविधा होती.

AI Chat chatbot
'बीएसएनएल’चा पुन्हा वाढू लागला ‘संचार’, महिनाभरात २५ हजार ग्राहकांची वाढ

प्रवाशांच्या सर्वाधिक तक्रारी

बस सेवेचा मार्ग, वेळ, बस स्थानकावरील प्रसाधनगृहाचा दर्जा, स्वच्छता, कर्मचाऱ्याची वर्तणूक, पिण्याचे पाणी, उद्‍घोषणा, प्रवास भाडे, सवलत न मिळणे, पासेस न मिळणे, बसमध्ये विसरलेल्या सामानांची चौकशी यासंदर्भातील बहुतांश तक्रारी प्रवाशांकडून केल्या जातात. या तक्रारींचे समाधान आता ‘चॅट बॉट’ आणि पुढे ‘एआय’च्या माध्यमातून करण्याचा मानस महामंडळाचा आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध राहील.

प्रश्‍न विचारताच तत्काळ मिळणार उत्तर

प्रवाशांना पडणारी विविध प्रश्नांची उत्तरे ‘चॅट बॉट’मध्ये समाविष्ट आहे. प्रवाशांनी प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर प्रवाशांना मिळणार आहे. एसटीची माहिती घेण्यासाठी येत्या काळात एआयचा वापर प्रवाशांना करता येणार आहे. त्यादृष्टिकोनातून महामंडळाने ‘चॅट बॉट’ची सेवा सुरू केली आहे. महामंडळ व प्रवासी यांच्यात साधली जाणारी ही एक संवाद प्रणाली आहे. प्रवाशांना आपल्या तक्रारी व अडचणी msrtc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘एमएसआरटीसी चॅट बॉट’ या विशेष सुविधेतून मांडता येणार आहे. तसेच प्रशासनाशी संवाद साधता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.