STARLINK : भारतातही मिळणार 'स्टारलिंक'चं सॅटेलाईट इंटरनेट? लायसन्ससाठी इलॉन मस्कने केला अर्ज

Elon Musk : स्टारलिंक सॅटेलाईटच्या माध्यमातून जगभरात ठिकठिकाणी हायस्पीड इंटरनेट पुरवलं जातं.
Elon Musk STARLINK
Elon Musk STARLINKeSakal
Updated on

इलॉन मस्कच्या स्टारलिंक सॅटेलाईटच्या माध्यमातून जगभरात ठिकठिकाणी हायस्पीड इंटरनेट पुरवलं जातं. यामुळे कित्येक देशांच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट पोहोचलं आहे. आता भारतातील ग्रामीण भागातही हे इंटरनेट उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इलॉन मस्कने भारतात 'ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाईट', म्हणजेच GMPCS संबंधित सेवा मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. Starlink ने खूप आधीपासून या लायसन्सची मागणी सुरू केली होती. या महिन्यात त्यावर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Elon Musk STARLINK
Elon Musk Big Decision : 'एक्स'च्या फ्री यूजर्ससाठी आणखी एक सुविधा होणार बंद! इलॉन मस्कची मोठी घोषणा

स्टारलिंकमुळे वाढणार स्पर्धा

CMAI असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष एन. के. गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत One Web आणि Jio Space ला GMPCS संबंधित सेवांचं लायसन्स मिळालं आहे. आता स्टारलिंकनेही परवानगी मागितली आहे. याचा अर्थ असा, की भारत सरकारची पॉलिसी जगभरातील लोक स्वीकारत आहेत.

इलॉन मस्क भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. स्टारलिंकला परवानगी मिळाल्यास आतापर्यंत देशाच्या ज्या भागात इंटरनेट पोहोचलं नाही, तिथे देखील सेवा पोहोचेल. मस्क भारताकडे नवीन बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. यामुळे भारतात नक्कीच स्पर्धा वाढणार आहे.

Elon Musk STARLINK
Elon Musk : 'एक्स'वर काही पोस्ट किंवा लाईक केल्यामुळे नोकरीत होतोय भेदभाव? बॉसला खेचा कोर्टात; मस्क करणार सगळा खर्च

भारत सरकारची पॉलिसी

गोयल म्हणाले, की GMPCS लायसन्स बाबत भारत सरकारने आपली पॉलिसी निश्चित केली आहे. जिथे केबल्स किंवा वीजेच्या तारा पोहोचू शकत नाहीत; जिथे मोबाईल टॉवर उभारणं शक्य होत नाही अशा ठिकाणी इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी GMPCS चा फायदा होतो. स्टारलिंकला GMPCS संबंधित परवानगी मिळाल्यानंतर पुढे अंतराळ संशोधन विभाग आणि इतर सरकारी विभागांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.