How To Sell On Meesho : सणासुदीच्या हंगामात ऑनलाईन बिझनेस सुरू करायचाय? मिशो है ना ! असं करा लॉगिन

आजकाल बरेच लोक मीशोवर ऑनलाइन वस्तू विकून चांगले पैसे कमवत आहेत
How To Sell On Meesho
How To Sell On Meesho esakal
Updated on

How To Sell On Meesho : आजकाल बरेच लोक मीशोवर ऑनलाइन वस्तू विकून चांगले पैसे कमवत आहेत. तुम्हालाही ऑनलाइन बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही मीशोची मदत होऊ शकते. मीशो मेगा ब्लॉकबस्टर सेल दरम्यान तुम्हाला चांगले ग्राहक सुद्धा मिळतील.

सणासुदीच्या काळात ऑनलाइन मोठ्या सवलतीच्या ऑफर उपलब्ध आहेत. Amazon-Flipkart सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करून तुम्हाला बंपर डील मिळतील. मीशोही या बाबतीत मागे नाही, कारण इथेही मेगा ब्लॉकबस्टर सेल सुरू आहे. कंपनी विविध उत्पादनांवर भरघोस सूट देत आहे. चांगले उत्पन्न मिळविण्याची ही एक संधी आहे. जर तुम्हाला ऑनलाइन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही Meesho वर वस्तू विकून चांगला इन्कम मिळवू शकता.

How To Sell On Meesho
Travel Tips : हॉटेल बुक करण्यापूर्वी 'या' छोट्या पण महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

मीशोमध्ये विक्रेता म्हणून सामील होणं खूप सोपं आहे. भारतीय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तुम्हाला करोडो ग्राहकांचे नेटवर्क देते, इथे तुम्ही तुमच्या वस्तू सहजपणे विकू शकता. मीशोने झिरो परसेंट कमिशनवर काम करण्याचा दावा केला आहे. याशिवाय, कंपनी शिपिंग आणि डिलिव्हरी सारख्या सेवा देखील प्रदान करते. यामुळे ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवणे खूप सोपं होतं.

How To Sell On Meesho
Adventure Travel Tips : Cycle सोलो ट्रिप प्लॅन करताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

Meesho वर अशा विका वस्तू

जर तुम्ही प्लॅन बनवला असेल आणि तुम्हाला कोणते उत्पादन विकायचे आहे ते ठरवले असेल तर तुम्ही Meesho मध्ये सामील होऊ शकता. Meesho वर विक्रेता होण्यासाठी, तुम्हाला नोंदणी करावी लागेल, ज्याची प्रक्रिया तुम्ही इथे पाहू शकता.

How To Sell On Meesho
Pregnancy Travel Tips : गरोदरपणात प्रवास करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Sign up for free:

Meesho वर विक्रेता म्हणून सामील होण्यासाठी, ॲक्टीव्ह बँक अकाऊंट आणि GST नंबर असणं आवश्यक आहे. GST नसेल तर एनरोलमेंट आयडी/यूआयडी देखील काम करू शकतात. Meesho वर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्णपणे फ्री आहे. तुम्ही मोबाईल क्रमांकाने रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करू शकता.

How To Sell On Meesho
Kargil Travel Destinations :  युद्धासाठीच नाहीतर या ठिकाणांसाठीही ओळखले जाते कारगिल, एकदा फोटो पहाल तर प्रेमातच पडाल

Upload your product & catalog:

रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर प्रोडक्ट लिस्ट करावे लागतात. तुम्ही कोणतेही प्रोडक्ट ठरवले असेल, त्याचा फोटो आणि सर्व माहिती द्यावी लागते. मीशो सप्लायर पॅनेलवर प्रोडक्ट डिटेल्स, फोटो आणि कॅटलॉग अपलोड करा.

How To Sell On Meesho
Mental health : आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर काय करावं?

Receive & Ship Orders:

एकदा प्रोडक्ट लिस्ट झाल्यानंतर, तुम्ही ऑर्डर घ्यायला सुरुवात करू शकता. मीशो अतिशय कमी किमतीत शिपिंग सर्विस देते. कंपनी जीएसटी विक्रेत्यांसाठी संपूर्ण भारतातील डिलिव्हरी आणि जीएसटी नसलेल्या विक्रेत्यांसाठी आंतर-राज्य डिलीवरी ऑफर करते.

How To Sell On Meesho
World Mental Health Day 2023: कामाच्या तणावामुळे मानसिक आरोग्यावरही होतो वाईट परिणाम, अशा प्रकारे करा स्वतःचा बचाव

Receive Payments:

Meesho वर विकल्या जाणार्‍या उत्पादनांचे पैसे थेट तुमच्या बँक अकाऊंट मध्ये येतात. कंपनी 7 दिवसांचे पेमेंट सायकल फॉलो करते. यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरचाही समावेश आहे.या सोप्या प्रक्रियेद्वारे, तुम्ही मीशो विक्रेता बनू शकता आणि तुमचा स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.