सॅक्सोफोनची निर्मिती करणाऱ्या 'अडॉल्फ सॅक्स' यांची कहाणी

संगीतक्षेत्रात क्रांती करणारं त्याचं सुप्रसिद्ध वाद्य म्हणजे 'सॅक्सोफोन'
Adolf Sax
Adolf Saxesakal
Updated on
Summary

आज (06 नोव्हेंबर) अडॉल्फ सॅक्स यांचा जन्मदिन. आपण संगीत ऐकताना मान डोलावतो, त्यावेळी आपला मूड बनतो पण त्याच्यामागे ही एवढी मोठी कहानी असते 'विज्ञान' असतं हे कळावं म्हणून हा प्रपंच!

मानवी समाजात काही ठिकाणी चुकीच्या धारणा रुजलेल्या आहेत त्यातलीच एक म्हणजे कला आणि विज्ञान यात प्रचंड अंतर आहे, किंबहुना ही दोन टोकं आहेत पण तसं नाहीये. उलटपक्षी बारकाईनं बघितल्यास लक्षात येतं की, हे दोन्ही घटक 'सभोवताल' समजावून घेण्यास मदत करतात, भले पद्धती-परंपरा वेगवेगळ्या असोत. अनेकदा कला आणि विज्ञान यांच्या मुलभूत प्रेरणा आणि ध्येय एकच असतात.

एखादं यंत्र बनवायचे असेल तर त्याचे आधी रेखाटन-आकृतीबंध-आराखडा बनवावा लागतो म्हणजे 'कला' आलीच आणि एखादं चित्र जरी रेखाटावं तरी त्यात रेषांची लांबी-रुंदी-जाडी याचं गणित सांभाळावं लागतं म्हणजे 'शास्त्र' आलंच. विज्ञानविश्वातील प्रत्येक शाखेत कला अंतर्भुत आहे. उदा. 'वैद्यकशास्त्र' तसेच कलाप्रांतात प्रत्येक कलेमागे तिचं आपले एक शास्त्र आहेच उदा. 'संगीत'.

Adolf Sax
माकडांवर प्रयोग करुन प्रेमभावनेचा शास्त्रीय उलगडा करणाऱ्या अवलियाची गोष्ट!

वैद्यकशास्त्रातील लिनॅक पासून जोसेफ लिओपोल्ड एय्नब्रगर यांच्यापर्यंत अनेक लोकांच्या विज्ञानाधिष्ठित कलाकारीच्या गोष्टी सांगितल्यात. आज संगीतक्षेत्रातील कलाधिष्ठित शास्त्राची गोष्ट सांगतो. त्याचा जन्म बेल्जियममधील 'दिनांत' या छोट्या शहरात चार्ल्स आणि मेरी या ज्यू दाम्पत्याच्या पोटी झाला. यांचे हे पहिलंच मुल. चार्ल्स आणि मेरी हे दोघंही विविध संगीत वाद्यं डिझाईन करत कुठला धातू वापरायचा, आकारमान-वजन किती असावे ते ऑपरेट कसे करायचे, बिघडलं तर दुरूस्ती कशी होईल हे सगळं बघणारे थोडक्यात वरवर 'कला' वाटत असलं तरी एक प्रकारचे 'अभियांत्रिकी' कामच ते करत होते. तो ही जसा रांगू लागला तसं विविध वाद्ये म्हणजे त्याच्यासाठी खेळणीच बनली.

आईबाबा बिचारे कामात गुंग असत आणि इकडं याचेही सातत्यानं काहीतरी 'उद्योग कम धडपड' सुरूच असे. एकदा हा गडी तिसऱ्या मजल्यावरून जावून डोकं दगडावर आपटल्यामुळे पुढं त्याला उभं रहाण्यास त्रास होऊ लागला. एकदा त्यानं उपकरण सफाईसाठी वापरण्यात येणारे ॲसिडच पिऊन टाकलं वरून पीनही गिळली. एकदा गनपावडरशी खेळता खेळता स्वत:ला आगही लावून घेतली. एकदा हे महाशय गरम कढईत सांडलेले पाणी समजून वार्निश पिऊन घेतलं. एकदा खडकावर आपटण्याचा पराक्रम केला तर एकदा नदीत वहात जाऊन ते मरता मरता वाचले.

Adolf Sax
पहिल्यांदाच सूक्ष्मजंतू व आदिजीवांचे निरीक्षण करणाऱ्या लेव्हेनहूक यांची कहाणी

आपल्या उद्योगांमुळे सातत्याने अडचणीत येऊन अगदी मरणाच्या दारातून परतायच्या त्याच्या सवयीमुळे आजूबाजूची मुलं त्याला 'छोटं भूत' म्हणत. पण त्याचे उद्योग अन् प्रयोग काही थांबले नाही. वयाच्या पंधराव्या वर्षी एका स्थानिक स्पर्धेत त्यानं त्याच्या दोन प्रकारच्या बासऱ्या आणि एक सनई बनवून नेल्या होत्या. ओघानं तो ही वाद्ये शिकत होता, सोबत 'रॉयल कॅजर्वेटरी ऑफ ब्रुसेल्स' या संस्थेत त्यांचा तो अभ्यासही करत होता. अभ्यासक्रम पुर्ण झाल्यावर तो आपल्या पालकांच्या उद्योगात जॉईन झाला. पालक अजूनही पारंपरिक वाद्यांवर अडकले होते इकडं हे छोटे भूत आता मोठे झाले होते. त्याने इथंही प्रयोग सुरू केले.

त्याने चोविसाव्या वर्षी स्वत: डिझाईन केलेल्या सनईचं पेटंट घेतलं आणि आपला मुक्काम कलेची जागतिक राजधानी पॅरीस इथे हलवला आणि त्याच्या प्रयोगशीलतेला उधाण आले. त्याने अनेक जुनी वाद्यांना क्रांतीकारक पद्धतीनं नवं रुप दिले, चिक्कार प्रयोग केले. आज बॅंड पथकात दिसणारे बिगूल, विविध तुताऱ्या, बासऱ्या, सनई हे सगळं त्याने पारंपरिक पद्धतींना फाटा देत नव रुपांतरण केलेली वाद्ये. त्याचे अनेक डिझाईन फेल गेले तर अनेक हिट ठरले पण त्यानं नवनवीन प्रयोग थांबवले नाहीत. सैन्याचे बॅंड, स्थानिक आर्केस्ट्रा यांच्यासाठी त्यांनी वाद्यात अनेक व्हेरिएशन्स केले आणि नवीन लोकांना प्रशिक्षितही केलं. अनेक कलाकारांपासून नेपोलियनपर्यंत अनेक लोकं त्याच्या डिझाईन्सचे चाहते होते.

Adolf Sax
वर्ल्ड फेमस ‘डनलप टायर्स’ बनवणाऱ्या डनलप भाऊंची कहाणी

त्याच्या वाद्यांनी एकुणच संगीतक्षेत्रात क्रांतीकारी बदल केले. अर्थात हे सगळं लिहिलंय इतकं सहजासहजी जुळत नव्हतं. रात्रंदिवस मेहनत करून तयार केलेली त्याची वाद्ये कलाकार एका सेकंदात मोडीत काढत, स्पर्धाही होतीच, कायदेशीर भांडणंही चालत. या सगळ्यात तो तीन वेळा कंगाल झाला, कदाचित सातत्यानं रसायनं-वाद्य हाताळणी यामुळे त्याला ओठांचा कर्करोगही झाला पण लहानपणी अशा संकटातून जसा वाचला तसा यातूनही बाहेर पडला पण त्याचा शेवट विपण्णावस्थेत झाला.

आज त्याच्या जन्मगावी त्याचं घर संगीतवाद्यांचं संग्रहालय बनून दिमाखात उभं आहे ज्याचं नाव आहे 'मिस्टर सॅक्स हाऊस' आर्केस्ट्रा आणि एकूणच संगीतक्षेत्रात क्रांती करणारं त्याचं सुप्रसिद्ध वाद्य म्हणजे सॅक्सोफोन अन् हे मिस्टर सॅक्स म्हणजे आज तुम्ही ज्याची गोष्ट वाचली ते अडॉल्फ सॅक्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.