'SONY'ची उलाढाल बिलियन डॉलर्समध्ये घेऊन जाणाऱ्या अवलियाची गोष्ट

गोष्ट आहे ‘सोनी’ (SONY) कॉर्पोरेशनची जो आज जगातील पहिल्या पाचमधील ब्रॅंड आहे.
Masaru Ibuka
Masaru Ibukaesakal
Updated on
Summary

500 अमेरिकन डॉलर्स मधून सुरू झालेला हा प्रवास आज इथपर्यंत पोहोचलाय याचं कारण आहे ‘संशोधन’आज ‘मसारु इबुका’ यांच्या स्मृतीदिनी सहज!

अनेकदा तुम्ही युरोप-अमेरिकन (Europe-American) लोकांचे गोडवे-त्यांची प्रयोगशिलता-त्यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन-त्यांची संशोधक (Researcher)वृत्ती याबद्दल अनेक वैज्ञानिकांच्या संदर्भानं वाचलंय. पण या सगळ्या लखलखीत इतिहासाला शोषणाची एक काळीकुट्ट झालर आहे. नुसतं भारताच्याच परिप्रेक्ष्यात बघायचं तर सतराव्या शतकात जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा २४.४ टक्के होता. ब्रिटिशांनी आपल्याला इतकं लुटलं की १९५० पर्यंत हा वाटा ४.२ टक्क्यांवर आला.

Masaru Ibuka
माकडांवर प्रयोग करुन प्रेमभावनेचा शास्त्रीय उलगडा करणाऱ्या अवलियाची गोष्ट!

हेच आशिया-आफ्रिका (Asia-Africa) इथल्या अनेक देशांबद्दल झालं. आज समृद्ध दिसत असलेल्या जपानचं (Japan) १९४५च्या युद्धापश्चात पुर्णपणं कंबरडं मोडलं होतं. अर्थव्यवस्था डबघाईला आली असं नव्हे तर जवळपास नष्टच झाली होती. आपल्याकडं ब्रिटिश ‘सांपत्तिक’ आवळ्याच्या बदल्यात ‘सुधारणावादी’ कोहळा तरी देऊन गेले होते. नंतर आपण आपल्याच कोषात राहत माती खाल्ली हा भाग निराळा पण जपानची अवस्था अमेरिकेनं अक्षरश: ‘बकाल’ करून टाकली होती. तरीही ते या सगळ्या बरबादीतून ताठ मानेनं उभं राहिले, कारण प्रत्येक जपानी माणसाच्या बारीकश्या डोळ्यात आपल्या देशाला पुन्हा उभं करायचं मोठ्ठं स्वप्न होतं, त्यासाठी रक्ताचं पाणी करायची तयारी होती. आज याच श्रेणीतल्या एका जपानी माणसाची आणि त्याच्या प्रेरणादायी स्वप्नाची गोष्ट सांगतो.

गोष्ट आहे ‘सोनी’ (SONY) कॉर्पोरेशनची जो आज जगातील पहिल्या पाचमधील ब्रॅंड आहे. ज्याचं स्वप्न बघितलं होतं पेशानं अभियंता (Engineer) आणि पेशीनं संशोधक (Researcher) असलेल्या ‘मसारू इबुका’(Masaru Ibuka) यानं. त्यानं पडक्या इमारतीत आपलं पहिलंवहिलं कार्यालय उघडत शहरवासियांच्या तुटक्या रेडिओचं रिपेअरिंग सुरू केलं. सचोटी-सकारात्मकता-कष्ट यांचा त्रिवेणी संगम झाला आणि सोबतच १९४६च्या मे महिन्यात या ‘बुद्धिमान संशोधक मसारु इबुका’ची भेट ‘प्रतिभावान व्यावसायिक अकीओ मोरिता’ याच्याशी झाली. ‘एकसे भले दो’ म्हणत मसारु आणि अकीओ यांनी एकत्र व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी TTK अर्थात टोक्यो टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग कॉर्पोरेशन (Tokyo Telecommunication Engineering Cor.)

Masaru Ibuka
Edwin Howard Armstrong : कहाणी रेडिओ तयार करणाऱ्या अवलियाची...

या नावानं कंपनी रजिस्टर केली. त्याची गुंतवणूक (Investment) होती जवळपास ५०० अमेरिकन डॉलर्स. त्यांनी भातासाठी कुकर-हिटींग पॅड आणि तत्सम गृहोपयोगी उपकरणं बनवायला सुरूवात केली. एकूणच व्यवसाय फार फायद्यात होता असं नाही पण जे काही चाललं होतं ते फारसं वाईटही नव्हतं. थोड्याच दिवसात त्यांना साऊंड रेकांर्डिंग साठी चुंबकिय टेप बनवायचं पेटंट मिळालं. थिस वॉज अ टर्निंग पॉंईंट. कंपनी आता ‘ट्रान्झिस्टर’ निर्मितीत उतरली.

१९५२ला त्यांनी आपला ट्रांझिस्टर बाजारात आणला आणि कंपनीचं TTK रेडिओ नाव बदलत 'सोनी'(sony) केलं. ‘सोनी’ नाव देण्याचं कारण म्हणजे या शब्दाची उत्पत्ती 'सोनस' या लॅटिन शब्दातून होते. सोनस म्हणजे आवाज. ट्रान्झिस्टरमुळे त्यांच्या गाडीनं वेग पकडला आणि त्यांनी पहिला पोर्टेबल रेडिओ शोधून काढला. यानंतर मात्र त्यांनी नंतर मागं वळून पाहिलंच नाही. मग आला टिव्ही पाठोपाठ व्हिसीआर त्या मागोमाग कॅल्क्युलेटर आणि लागलीच कॅमकॉर्डर. त्यांनी एकापाठोपाठ एक सर्जनशील आणि दर्जेदार उत्पादनाची परंपराच सुरू केली. पण सोनीचा केवळ हा उद्देश नव्हता. त्यांचं मुख्य लक्ष्य ज्यांनी त्यांना धुळीस मिळवलं होतं. त्या अमेरिकेच्या बाजारात धुव्वा उडवायचा होता. त्यांना स्वत:बद्दल यत्किश्चितही संशय नव्हता की ते आतापोवेतो ‘इलेक्ट्रॉनिक्स’ उत्पादकांतले डॉन झाले होते.

Masaru Ibuka
'डायनामाइट'सारखं घातक स्फोटक बनवणाऱ्या वैज्ञानिकाची गोष्ट

मसारु जितका चाणाक्ष संशोधक होता अकीओ तितकाच चतुर व्यवस्थापक. आपली उत्पादनं फारशी चालणार नाहीत किंबहुना नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, याची जाणीव असूनही त्यांनी आपल्या गट फिलिंग आणि मुलभूत प्रेरणांवर विश्वास ठेवला. कॅसेट रेकॉर्डरची संकल्पना जेव्हा त्यांच्या डोक्यात आली तेव्हा चर्चेअंती त्यांनी काही गोष्टी फिक्स केल्या जसं-

- कॅसेट तळहातावर बसली पाहीजे..

- तिच्यातून येणारा आवाज सुस्पष्ट पाहिजे..

- तिच्यात अधिकाधिक गाणी सामावली पाहिजे..

आता समस्या एवढीच होती की ही गाणी ऐकणाऱ्याला मौज तर वाटली पाहिजे, परंतु इतरांना या आवाजाचा त्रासही व्हायला नको. स्पिकरविना टेप रेकॉर्डर? छ्याऽऽ असं कसं? बाजार विश्लेषकांनुसार ही कल्पनाच वाह्यात होती. अपयशावर त्यांनी आधीच शिक्कामोर्तब करून टाकलं होतं. कुठं पाश्चात्य तंत्रज्ञान? कुठं या वायफळ कल्पना? याऐवजी ‘यांनी पाश्चात्य उपकरणं दुरूस्त करावेत’कुणीतरी दिडशहाण्याने अनाहूत सल्लाही देऊ केला होता. माघार घेतील ते जपानी कसले? या बहाद्दरांनी १ जुलै १९७९ला जगासमोर ‘वॉकमन’आणला आणि भारी बलंडर हो गया. हा हा बघता शंभर मिलियन वॉकमन विकले गेले. दस्तूरखुद्द मसारुनं हे स्वप्नातही पाहिलं नव्हतं पण हे झालं. चालता चालता आपल्या आवडीचं संगीत ऐकणं हा अमेरिकेतला फॅशन ट्रेंड झाला.

सोनीनं सातत्यानं संशोधनावर काम केलं. १९८२ला त्यांनी सीडी प्लेअर आणि १९८५ला व्हिडिओ कॅमेरा बाजारात आणला. जपान काय अमेरिकेतही खरेदीचे उच्चांक स्थापित झाले. आज सोनीची उलाढाल बिलियन डॉलर्समध्ये आहे. प्ले स्टेशन-स्मार्ट फोन-लॅपटॉप-टिव्ही-कॅमेरे आणि काय नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.