Constantine Fahlberg : 'सॅकरीन'चा शोध लावणाऱ्या अवलियाची गोष्ट

सॅकरीनला आहारमुल्य नाही आणि ते मुत्रावाटे शरीरातून बाहेरही टाकले जाते, त्यामुळे साखरेऐवजी पदार्थाला गोडी आणण्यास ते वापरले जाऊ लागले.
Constantine Fahlberg
Constantine Fahlberg esakal
Updated on
Summary

आज कॉन्स्टन्टाईन फाहलबर्ग (Constantine Fahlberg) यांच्या जन्मदिनी सहज!

विज्ञानविश्वात अनेक शोध अपघाताने लागले. इथे एका डॉक्टरने उर्जादायी औषध बनवताना अपघातानेच ‘कोका कोला’ (Coca Cola) आणले तर हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खटाटोप करताना एका अभियंत्याने अपघाताने थेट ‘पेसमेकर’च (Pacemaker) बनवून टाकले. आज याच श्रेणीतल्या ‘सॅकरीन’ची (Saccharin) गोष्ट सांगतो. अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ इरा रेम्सन यांच्या कॉन्स्टन्टाईन फाहलबर्ग (Constantine Fahlberg) नामक विद्यार्थ्याने एक दिवस डांबरावर प्रयोग करत असताना एक नवे संयुग तयार केले आणि वेळ झाल्याने नेहमीप्रमाणे तो घरी परतला. या दिवशी या प्रयोगात वेळेचे भान न राहिल्याने उशीर झाला होता, त्यामुळे पठ्ठ्याने प्रयोगशाळेतून बाहेर पडण्यापूर्वी हात धुणं चक्क विसरला होता. परततांना सहजपणे त्याने आपली जीभ ओठावरून फिरली तेव्हा त्याला जीभेला अत्यंत गोडवा जाणवला. ‘कुछ तो गडबड हैं’त्याच्या लागलीच लक्ष्यात आले.

Constantine Fahlberg
'SONY'ची उलाढाल बिलियन डॉलर्समध्ये घेऊन जाणाऱ्या अवलियाची गोष्ट

कामाच्या गडबडीत अनवधानाने हात ओठांना लागला असणार त्यामुळे बनवलेल्या नव्या संयुगाचे काही सूक्ष्म कण ओठांना नक्कीच चिकटले असणार आणि ही चव कदाचित या नव्या संयुगाचीच असणार. एव्हाना पोटात कावळे कोकत होते. घरात गेल्या गेल्या तो हे प्रयोगशाळा-रसायनं-संयुग सगळं विसरला होता त्याने घाईत डायनिंगवरचे पुडिंग तोंडात टाकले. ते ही मस्त गोड. त्याने घरात विचारणा केली तेव्हा कळलं पुडिंगमध्ये साखर (Sugar) टाकलेलीच नव्हती. आता मात्र त्याला कळून चुकलं की ‘हात स्वच्छ न धुतल्यामुळे’बोटांना लागलेल्या या नव्याने बनवलेल्या संयुगाचा काही अंश चिकटला असावा अन् त्यामुळे हे कांड झालेय.

Constantine Fahlberg
माकडांवर प्रयोग करुन प्रेमभावनेचा शास्त्रीय उलगडा करणाऱ्या अवलियाची गोष्ट!

बरं हे संयुग साखरेहून चक्क किती तरी पट जास्त गोड होतं. आधी बेंझॉईक सल्फिनाईड (Benzoic Sulfenide) हे शास्त्रीय नाव असलेल्या या संयुगाला फाहलबर्गनं साखरेचं लॅटिन नाव दिलं ते म्हणजे ‘सॅकरीन’ (Saccharin) फाहलबर्गनं तातडीनं या संयुगाचं पेटंट घेतलं आणि आपला काका डॉ. ॲडॉल्फ लिस्ट याच्या साथीनं आधी प्रयोग म्हणून काही ‘ग्रॅम’ बनवलेले या संयुगाचं थेट टनावारी उत्पन्न घेतले आणि भरपूर पैसा छापला. साखरेत केवळ कार्बन-हायड्रोजन-ऑक्सिजन ही मुलद्रव्ये असतात पण सॅकरीनमध्ये मात्र नायट्रोजन आणि सल्फर यांचाही समावेश असतो. सॅकरीनची पाण्यात विद्राव्यता कमी असल्याने त्याची गोडीही त्यापासून बनणाऱ्या ॲनायन अर्थात ऋणभारयुक्त आयनमुळे असते. सॅकरीनचे सोडियम आणि अमोनियम यांच्याबरोबर केलेले क्षार वापरले जातात.

Constantine Fahlberg
'डायनामाइट'सारखं घातक स्फोटक बनवणाऱ्या वैज्ञानिकाची गोष्ट

क्षाराचं पाण्यातील संहत द्रावण कडवट असते, पण पाण्याचे प्रमाण वाढवत जावे, तसतशी द्रावणाची चव गोड होत जाते. सॅकरीनला आहारमुल्य नाही आणि ते मुत्रावाटे शरीरातून बाहेरही टाकले जाते, त्यामुळे साखरेऐवजी पदार्थाला गोडी आणण्यास ते वापरले जाऊ लागले. अनेकदा टूथपेस्ट-तयार अन्नपदार्थ-पेयं यांच्यासाठी ते उपयोगात आणले जाते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही साखरेला पर्याय म्हणून ते अंशत: उपयुक्त ठरते. मध्यंतरी सॅकरीनमुळे मूत्राशयाचा कर्करोग संभवतो अशी टूम निघाली होती पण प्रयोगांती सॅकरीनला सुरक्षित घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.