Alchohol Side Effects : दारू अन् एनर्जी ड्रिंक तुम्हाला बनवू शकतात 'गजनी'! संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

Science Study : असंख्य तरुणांमध्ये रात्रीच्या पार्टीत दारूसोबत एनर्जी ड्रिंक पिण्याची वाढती चाल आहे. त्याचे मेंदूवर फार वाईट दुष्परिणाम होतात.
Mixing Alcohol and Energy Drinks Impairs Memory
Mixing Alcohol and Energy Drinks Impairs Memoryesakal
Updated on

Memory Loss : असंख्य तरुणांमध्ये रात्रीच्या पार्टीत दारूसोबत एनर्जी ड्रिंक पिण्याची वाढती चाल आहे. पण, असा प्रकार मेंदूच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे अशी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. इटलीच्या एका विद्यापीठात केलेल्या संशोधनानुसार, एनर्जी ड्रिंक आणि दारू एकत्र केल्याने स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.

संशोधकांनी उंदीरांवर हे संशोधन केले. त्यांना फक्त दारू,फक्त एनर्जी पेय किंवा दोन्ही मिश्रण देण्यात आले. 53 दिवसांपर्यंत हा प्रयोग चालला. त्यानंतर उंदरांच्या स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता तपासण्यात आली. ज्या उंदीरांना मिश्र पेय दिले होते त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये कमजोरी आढळून आली. इतकेच नाही तर त्यांच्या हिपोकॅम्पस (स्मरणशक्ती आणि शिकण्याशी संबंधित मेंदूचा भाग) मध्येही बदल दिसून आले.

Mixing Alcohol and Energy Drinks Impairs Memory
Lunar Mystery : चंद्रावरच्या 'त्या' खंडकांचं रहस्य उलघडलं! शास्त्रज्ञांचा आश्चर्यकारक खुलासा

विशेष रूपाने तरुण वयात, जेव्हा मेंदूचा विकास होत असतो त्या काळात एनर्जी ड्रिंक आणि दारू पिणे टाळावे असा सल्ला संशोधक देतात. यामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

हे संशोधन मानवांवर करणे आवश्यक असले तरी, सध्याच्या निष्कर्षांवरून दारू आणि एनर्जी पेयांचे मिश्रण आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे दिसून येते.

Mixing Alcohol and Energy Drinks Impairs Memory
Airtel Data Leak : एअरटेलने दुसऱ्यांदा विकला ३७ कोटी भारतीयांचा पर्सनल डेटा? हॅकरकडून डेटा लिकच्या पुराव्यांवर कंपनी म्हणाली...

संशोधनादरम्यान उंदीरांना दिलेले पेयांचे प्रमाण हे तरुणांमध्ये दिसणार्‍या 'बिंग ड्रिंकिंग' (थोड्या वेळात मोठ्या प्रमाणात दारू पिणे) इतके होते. हा तरुणांमध्ये वाढता प्रचंड असून त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात यावर अधिक संशोधन करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.