UPSC Topper मात्र IAS पदाचा राजीनामा देत स्वीकारला 2500 रुपयांचा जॉब अन् आज...

मारुती कंपनीशी जुडण्याआधी आर. सी. भार्गव हे आयएस अधिकारी होते. जाणून घेऊया त्यांची रंजक सक्सेस स्टोरी
Success Story Of Maruti Suzuki Chairman
Success Story Of Maruti Suzuki Chairman esakal
Updated on

Success Story Of Maruti Suzuki Chairman : देशातील सगळ्यात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने अलीकडे रेकॉर्ड ब्रेक करत १ लाख कोटी रुपयांचा रिवेन्यू जनरेट केलाय. हा विक्रम गाजवणारी ही भारतातील पहिलीच कंपनी ठरलीय. कंपनीच्या या यशामागे चेअरमॅन आर. सी. भार्गव यांची महत्वाची भूमिका आहे. मारुतीसह जुडल्यानंतर त्यांच्या मेहनीते आणि अथक प्रयत्नांनी त्यांनी कंपनीला यशाच्या सातव्या शिखरावर पोहोचवले आहे. मात्र तुम्हाला माहितीये काय मारुती कंपनीशी जुडण्याआधी आर. सी. भार्गव हे आयएस अधिकारी होते. जाणून घेऊया त्यांची रंजक सक्सेस स्टोरी.

आर. सी च्या एका निर्णयाने पालटलं त्याचं नशीब

सध्या देशात तरुण पिढीचा कल हा स्वत:चा स्टार्टअप टाकण्याकडे दिसून येतो. देशातूनच नाही तर विदेशातूनसुद्धा बक्कळ पगार मिळणारी नोकरी सोडून स्वत:चा स्टार्टअप टाकत नशीब आजमावण्याच्या तयारीत दिसून येतात. मागल्या ४ दशकांत ही तळमळ भारतातील बऱ्याच तरुणांमध्ये दिसून आली. त्यातील एक होते मारुतीचे सध्याचे चेअरमॅन आर.सी. भार्गव. आरामदायी सरकारी नोकरी सोडत त्यांनी प्रायव्हेट कंपनीत स्वत:चं नशीब आजमावण्याचं धाडस केलं.

1956 बॅचचे आयएस अधिकारी भार्गव

आर. सी भार्गव हे 1956 च्या बॅचचे आयएएस अधिकारी यूपीएससीमध्ये अव्वल आहेत. अनेक वर्षे आयएसची नोकरी केल्यानंतर एक टप्पा असा आला जेव्हा त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला. खरं तर, त्यांनी 80 च्या दशकात या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि देशातील आघाडीची ऑटो कंपनी मारुती सुझुकीसोबत करियरचा नवा प्रवास सुरु केला.

IAS अधिकाऱ्याने 2250 रुपये पगाराचं काम स्वीकारलं

प्रशासकीय अधिकाऱ्याची नोकरी सोडून मारुती सुझुकी जॉईन केलेल्या भार्गव यांना त्यावेळी सुमारे 2250 रुपये पगार मिळत असे. मात्र ते ज्या पद्धतीने या कंपनीसाठी मेहनत घेत होते, त्याची दखल घेत कंपनीने त्यांना पदोन्नती दिली. पदोन्नतीबरोबरच कंपनीची उन्नतीसुद्धा वाढतच गेली. त्यांच्या योगदानाने नवीन उंचीला स्पर्श करण्यास सुरुवात केली आणि कालांतराने मारुती सुझुकीमध्ये आर.सी. भार्गवचे वर्चस्व देखील उंचीवर पोहोचू लागले.

Success Story Of Maruti Suzuki Chairman
Success Tips : यशस्वी व्हायचं असेल तर सोडा या ६ सवयी, गुरू गौर गोपाल दास यांनी दिल्या खास टिप्स

हळू हळू कंपनीत भार्गव यांची प्रतिष्ठा आणि दर्जा वाढला

रिपोर्ट्सनुसार, आर.सी. भार्गव 1981 मध्ये मारुती सुझुकी कंपनीमध्ये रुजू झाले. प्रत्यक्षात ते प्रशासकीय सेवेतून एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीवर कंपनीत रुजू झाले होते. परंतु, जेव्हा सरकारने या प्रतिनियुक्तीला मुदतवाढ देण्यास नकार दिला तेव्हा आर.सी. भार्गव यांनी मोठा निर्णय घेतला आणि आयएएसची नोकरी सोडून मारुतीसोबत पुढे जाण्याचे ठरवले.

त्यांचा हा निर्णय केवळ त्यांचेच नव्हे तर मारुती सुझुकीचेही नशीब बदलणारा ठरला. कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या आर.सी. भार्गव यांना लवकरच मारुती सुझुकीच्या जॉइंट वेंचरचे फुल टाइम डायरेक्ट बनवण्यात आले. यानंतर ते 1985 मध्ये एमडी झाले आणि 1997 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. (automobile)

भार्गव यांनी मारुतीला प्रगतीच्या शिखरावर पोहोचवले

वयाच्या 48 व्या वर्षी मारुती सुझुकी जॉईन केलेले आर.सी. भार्गव आता 88 वर्षांचे आहेत आणि अजूनही कंपनीचे अध्यक्ष आहेत. आरसी भार्गव यांचे वार्षिक वेतन सुमारे दीड कोटी रुपये आहे. जपानी कंपनीचे मालक ओसामू सुझुकी यांनी स्वत: एका मुलाखतीदरम्यान आर.सी. भार्गवच्या क्षमतेबद्दल बरेच काही सांगितले होते.

सुमारे 8 वर्षांपूर्वी 2015 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, जर आर.सी भार्गव आमच्या कंपनीत नसते तर कंपनी एवढ्या यशस्वीरित्या पुढे जाऊ शकली नसती. आज मारुती सुझुकी इंडियाने एक लाख कोटी रुपयांचा रेकॉर्डब्रेक रिव्हेन्यू जनरेट केलाय. कंपनीचे मार्केट कॅप 2.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.