Car tips for Summer : देशातील बहुतांश भागात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उकाडा सुरू झाला आहे. मे महिन्यात आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील लागतील. अशा वेळी फिरायला जाण्यापूर्वी आपल्या चारचाकी वाहनाची तपासणी करुन घेणं गरजेचं आहे. तसंच उन्हापासून तुमच्या कारचा बचाव होण्यासाठी काही टिप्स देखील फॉलो करणं आवश्यक आहे.
सगळ्यात आधी आपल्या कारचं इंजिन ऑईल तपासून घ्या. ऑईल बदलून बरेच दिवस झाले असतील, तर जुनं तेल बदलून पुन्हा नवीन टाकून घ्या. उन्हाळ्यात जुनंच ऑईल वापरल्यामुळे ओव्हरहीटिंग आणि इंजिन बंद होणे अशा समस्या जाणवू शकतात. यासोबतच ऑईल फिल्टरची तपासणी करून घेणंही गरजेचं आहे.
उन्हाळ्यात ज्याप्रमाणे आपल्याला हायड्रेट करणं गरजेचं आहे, तसंच गाडीला हायड्रेट ठेवणंही गरजेचं आहे. गाडीमधील कूलंट हे इंजिनला थंड ठेवतं. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचं कूलंट गाडीमध्ये असणं आवश्यक आहे.
चांगल्या कूलंटसोबतच रेडिएटर, फॅन आणि एअर फिल्टर या गोष्टीही इंजिनला थंड ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे, या गोष्टींची तपासणी करून घेणंही आवश्यक आहे. कूलंट आणि इतर गोष्टी सुस्थितीत असतील, तर गाडीमधील एसीदेखील व्यवस्थित थंड हवा देतो.
उन्हाळ्यात कुठे बाहेर जाण्यापूर्वी गाडीमधील एसीदेखील तपासून घेणं गरजेचं आहे. तसंच, उन्हामुळे रस्ते गरम झालेले असताना टायर फुटण्याचा धोकाही असतो. त्यामुळे टायरची क्वालिटी, हवेचा दाब अशा गोष्टींची तपासणी करणं गरजेचं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.