Sunita Williams Space Olympics Video : पॅरिस ऑलिम्पिक्सच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील (ISS) अंतराळवीरांनीही आपले स्वतःचे खेळ आयोजित केले आहेत. नासाने नुकताच एक मनोरंजक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह इतर अंतराळवीर खेळाडूंच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.
“पॅरिसमध्ये 26 जुलै रोजी अधिकृतरीत्या 2024 च्या ऑलिम्पिकची सुरुवात झाली. जगातील सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जमले आहेत. त्याच वेळी, पृथ्वीच्या वरती फिरणाऱ्या प्रयोगशाळेत म्हणजेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर नासाचे अंतराळवीर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत,” असे नासाने म्हटले आहे.
व्हिडीओची सुरुवात खोट्या ऑलिम्पिक मशाल हस्तांतरणाच्या दृश्याने होते. जॅनेट एप्स पासून बुच विल्मोरकडे ही मशाल पोहोचते. विल्मोर हा पृथ्वीचे विहंगम दृश्य दाखवणाऱ्या खास क्युपोला नावाच्या खोलीत उपस्थित आहे.
नंतर, खेळांसाठी क्रू तयार होते. एप्स आणि सुनीता विल्यम्स व्यायाम करण्यासाठी हातवारे हलवतात, विल्मोर त्याचे शरीर ताणते, तर ते सर्व अवकाशात तरंगणारे पाणी पितात.मायकल बॅरेट टेपने बनवलेली एक चेंडू फेकतो, तर विल्मोर फ्रिसबीसारखी वस्तू फेकतो. विल्यम्स आणि डोमिनिक जिम्नॅस्टिक हालचाली करतात, तर एप्स हॉलमधून धावते. कॅल्डवेल डिस्ने विल्मोर आणि बॅरेट यांनी धरलेली एक जड भार उचलतो.
व्हिडीओच्या शेवटी, खऱ्या ऑलिम्पियन खेळाडूंच्या कठोर परिश्रमांचेही कौतुक केले जाते.
“गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर ऑलिम्पिक खेळाडू बनण्याची खूप मजा आली,” असे डोमिनिक यांनी व्हिडिओमध्ये सांगितले. “आम्हाला गुरुत्वाकर्षणाचा फायदा झाला नाही. या वास्तविक गुरुत्वाकर्षणात क्रीडा प्रकार खेळणे जगविख्यात खेळाडूंसाठी किती कठीण असावे याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील आम्ही सर्वजण ऑलिम्पिक खेळांमधील प्रत्येक खेळाडूला शुभेच्छा देतो",असे या व्हिडिओमधून अंतराळवीर बोलताना दिसत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.