Sunita Williams: सुनीता विल्यम्स अंतराळातून करणार मतदान, जाणून घ्या कशी असणार प्रक्रिया

Sunita Williams: अंतराळात अडकलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अमेरिकेच्या येत्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पण अंतराळातून मतदानाची प्रक्रिया कशी असणार आहे हे जाणून घेऊया.
Sunita Williams:
Sunita Williams: Saka
Updated on

Sunita Williams: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोइंगच्या स्टारलायनर यानातील बिघाडामुळे अडकले आहेत. या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात बोईंग स्टारलाइनर अंतराळयान सुनीता आणि बुच यांना अंतराळात घेऊन गेले.

नासाने माहिती दिली आहे की ते अडकलेल्या दोन्ही अंतराळवीरांना फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परत आणतील. अमेरिकेत ५ नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत . दोन्ही अमेरिकन अंतराळवीरही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पण ही प्रक्रिया कशी असते हे सोप्या शब्दात समजून घेऊया.

सुनिता आणि बुच मतदान करतील

विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ‘नासा’च्या अंतराळवीर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान करण्याचा विचार करीत आहेत. ‘अंतराळातून मतदान करणे हे अविस्मरणीय असेल,’ असे विल्यम्स म्हणाल्या.

अमेरिकेत पाच नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान करता यावे, यासाठी मतदानपत्रिका पाठविण्याची विनंती मी आज केली आहे,’ असे विल्मोर यांनी सांगितले. ‘नागरिक म्हणून हे महत्त्वाचे कर्तव्य आहे. मी अंतराळातून मतदान करू शकते, हे अविस्मरणीय ठरणार आहे,’’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

विल्यम्स आणि बुच यांनी शुक्रवारी (ता.१३) आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून (आयएसएस) पत्रकार परिषदेत भाग घेतला. बोइंगच्या स्टारलायनर यानातील बिघाडामुळे ‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील आठ दिवसांचा मुक्काम आठ महिन्यांपर्यंत वाढला आहे.

‘स्टारलायरनर’ गेल्या आठवड्यात पृथ्वीवर परतले. त्यांनतर प्रथमच या दोन्ही अंतराळवीरांनी पत्रकारांशी संवाद साधला. पृथ्वीपासून सुमारे ४२० किलोमीटर दूर असलेल्या ‘आयएसएस’वरून बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर मतं व्यक्त केली व प्रश्‍नांना उत्तरेही दिली.

पार्श्‍वभूमीवर या दोघांनी काल संवाद साधला. विल्यम्स म्हणाल्या,‘‘अंतराळात राहणे मला आवडते. ही माझ्या आवडीचे ठिकाण आहे. ‘आयएसएस’वर अन्य सहकाऱ्यांबरोबर राहताना मला माझे कुटुंब आणि दोन कुत्र्यांची आठवण येते. माझ्या मित्रपरिवालाचीही मला आठवण येते. पण ते समजूतदार आहेत. त्यांच्यासाठीही हा कठीण काळ आहे, याची जाणीव मला आहे. पण सर्वांनी समजून घेतले आहे आणि प्रत्येकजण आम्हाला परत येण्यासाठी धीर देत आहे.”

काय आहे प्रक्रिया

1997 पासून नासाचे अंतराळवीर स्पेस स्टेशनवरून निवडणुकीत मतदान करत आहेत. अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या परिभ्रमण प्रयोगशाळेतून इलेक्ट्रॉनिक मतपत्रिकेद्वारे मतदान करत आहेत. इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका सॅटेलाइट फ्रिक्वेन्सीद्वारे स्पेस स्टेशनवर पाठवल्या जातात, त्यानंतर अंतराळवीर त्यांचे मत देतात.

यानंतर इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका पृथ्वीवर परत पाठवल्या जातात. ह्यूस्टनमधील नासाच्या मिशन कंट्रोल सेंटरला पाठवण्यापूर्वी ही मते अन्क्रिप्ट केली जातात. त्यानंतर ते योग्य काउंटी क्लर्ककडे पाठवले जाते.

Sunita Williams:
Mobile Phone Addiction : मोबाईल फोन आणि नवे आजार

या अंतराळवीराने अंतराळातून पहिल्यांदा केले होते मतदान

डेव्हिड वुल्फ हे मीर स्पेस स्टेशनवरून मतदान करणारे पहिले व्यक्ती होते. 1997 मध्ये टेक्सासच्या खासदारांनी नासाच्या अंतराळवीरांना अंतराळात असताना मतदान करण्याची परवानगी देणारा कायदा बनवला होता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.