Sunita Williams Health: सुनिता विल्यम्सना अंतराळात काय झालं? नासा देखील टेन्शनमध्ये, झपाट्याने कमी होतय वजन, फोटो पाहून तुम्हीही व्हाल शॉक

Sunita Williams Weight Loss in Space Station : सुनीता विल्यम्स यांचे वजन अंतराळ स्थानकावर घटल्याचे फोटो समोर आल्याने त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
Sunita Williams Health Risk International Space Station
Sunita Williams Health Risk International Space Stationesakal
Updated on

Sunita Williams Latest Update : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेल्या 150 दिवसांपासून अडकून आहेत. बोईंग कंपनीच्या स्टारलायनर यानाच्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांचं पृथ्वीवर परतणं लांबणीवर पडलं आहे. स्टारलायनर यानाचं यशस्वी लँडिंग न झाल्यानं विल्यम्स यांना दीर्घकाळ अंतराळात राहावं लागलं. परिणामी, सुनीता विल्यम्स यांचे वजन घटल्याचे फोटो समोर आल्याने त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

sunita williams health concern in space station
sunita williams health concern in space stationesakal

अंतराळातल्या प्रवासामुळे आरोग्यावर होणारा परिणाम

अंतराळात जास्त काळ राहिल्यास वजन कमी होणं, स्नायू आणि हाडांचा ऱ्हास, हृदय व दृष्टीशी संबंधित समस्या आणि मूत्रपिंडातील खड्यांपर्यंतच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळाच्या अंतराळ प्रवासामुळे महिला अंतराळवीरांच्या स्नायू आणि हाडांवरील परिणाम जास्त तीव्र असतो, असं नासाच्या संशोधनात आढळलं आहे. विशेषतः महिलांमध्ये वजन टिकवणं कठीण होतं, असंही अभ्यासातून समोर आलं आहे.

विल्यम्स यांचा चेहरा आणि शरीरावरील सडपातळ रचना पाहून त्यांना आरोग्याचा गंभीर फटका बसल्याचं स्पष्ट होत आहे. “सुनीता विल्यम्स यांचे वजन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. तिच्या शरीरावर केवळ हाडं आणि त्वचा उरली आहे. त्यामुळे तिचं वजन स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असं नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Sunita Williams Health Risk International Space Station
Whatsapp Group Admin License : हे काय नवीन! व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन होण्यासाठी द्यावे लागणार 4000 रुपये; या सरकारचा नवा नियम पाहिला का?

अंतराळातले आहार आणि व्यायामाचे महत्त्व

अंतराळात दीर्घकाळ राहणाऱ्या अंतराळवीरांना तंदुरुस्त राहण्यासाठी 3,500 ते 4,000 कॅलरींचे अन्न आवश्यक असतं. सुनीता विल्यम्स यांना वजन वाढवण्यासाठी 5,000 कॅलरींचं सेवन करावं लागतं, असं नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अंतराळात अन्नाचे अनेक प्रकार वापरण्यात येतात, जसे की फ्रीझ-ड्राय फूड, थर्मो-स्टॅबिलाइज्ड फूड (कॅनमध्ये ठेवलेले मासे किंवा चिकन), आणि पावडरयुक्त पेय यांचा समावेश असतो. याशिवाय त्यांना स्नायू आणि हाडं मजबुत ठेवण्यासाठी दररोज दोन तास व्यायाम करावा लागतो.

Sunita Williams Health Risk International Space Station
Car Safety Ratings : ग्लोबल कार क्रॅश टेस्ट आहे तरी काय? कारची सुरक्षा रेटिंग कशी ठरवली जाते,पाहा

सुनीता विल्यम्सच्या आरोग्यावर नासाचं स्पष्टीकरण

नासा सुनीता विल्यम्सच्या आरोग्याच्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. अंतराळ स्थानकावरील सर्व अंतराळवीरांना नियमित वैद्यकीय तपासणी करून त्यांचे आरोग्य सांभाळले जात आहे, असे नासाचे प्रवक्ते जिमी रसेल यांनी सांगितले. सध्या विल्यम्स आणि विलमोर हे अंतराळात असून, फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांचं पृथ्वीवर परतणं अपेक्षित आहे. त्यांना स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून परत आणण्याची योजना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.