Android Gaming : गॅमर्ससाठी आनंदवार्ता! आता हाताची हालचाल न करता खेळू शकताय गेम्स!

Online Gaming : लवकरच येतोय 'प्रोजेक्ट गेमफेस', गुगल आणि सुपरगेमिंगची पार्टनरशिप
सुपरगेमिंग कंपनी 'प्रोजेक्ट गेमफेस' लाँच करत आहे.
सुपरगेमिंग कंपनी 'प्रोजेक्ट गेमफेस' लाँच करत आहे. esakal
Updated on

Gaming : हातांचा किंवा बोटांचा वापर न करता गेम खेळता आली असती तर.. ऐकून भारी वाटतंय ना. आता ही कल्पना सत्यात उतरणार आहे. सुपरगेमिंग कंपनी असाच एक गेमिंग प्लॅटफॉर्म लाँच करत आहे. गुगलच्या दरवर्षीय डेव्हलपर कॉन्फरन्स I/O 2024 मध्ये या आठवड्यात कंपनीने त्यांचं नवीन ऑपरेटिंग सिस्टम Android 15 आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी (AI) संबंधित अनेक घोषणा केल्या.

या कॉन्फरन्सदरम्यान, गुगल आणि सुपरगेमिंग यांनी Android वापरणाऱ्या तब्बल 3 अब्ज डिव्हायसेससाठी गेम खेळणे आणखी सोपे करण्यासाठीच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.

'प्रोजेक्ट गेमफेस' या नावाच्या या नवीन तंत्रज्ञानात भारतात तयार झालेलं 'इंडस' या युद्धरॉयल गेमचा वापर करण्यात आला. या प्रोजेक्ट गेमफेसच्या साहाय्याने खेळाडू त्यांच्या भुवया उंचावून क्लिक आणि ड्रॅग करू शकतात किंवा तोंड उघडून, बोलून कर्सर हलवू शकतात. यामुळे आता गेमिंग सर्वांसाठी सोपे होणार आहे. गेमिंग जगतात सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे.

सुपरगेमिंग कंपनी 'प्रोजेक्ट गेमफेस' लाँच करत आहे.
Microsoft Game Store : मोबाईल गेमर्ससाठी आनंदाची बातमी! Microsoft जुलैमध्ये स्वतःचे मोबाईल गेम स्टोर लाँच करणार

सुपरगेमिंग कंपनी मास्कगन, बॅटल स्टार्स आणि आगामी इंडियन -फ्यूचरिस्टिक युद्धरॉयल गेम इंडस असे गेम देणारी कंपनी आहे. हे सर्व गेम्स कंपनीच्या स्वतःच्या 'सुपरप्लॅटफॉर्म'वर बनवलेली आहे. याच प्लॅटफॉर्मवर बँडाई नामको कंपनीचा प्रसिद्ध पॅकमॅन गेम मोबाईलवर उपलब्ध आहे.

सुपरगेमिंग कंपनी 'प्रोजेक्ट गेमफेस' लाँच करत आहे.
Adobe Editing : अडोबी क्रिएटिव्ह सुट वापरताय? 'हे' शॉर्टकट्स माहिती असायलाच हवेत

"प्रोजेक्ट गेमफेस आणि गुगल ए.आय.च्या साहाय्याने गेमिंग सर्वांसाठी आणखी मनोरंजक आणि सोपे बनणार आहे, गुगल I/O 2024 मध्ये इंडसच्या माध्यमातून आम्ही सर्वांसाठी गेमिंगची सर्वात सोपी आणि सर्वांना समाविष्ट करणारी पद्धत सादर केली आहे. गुगलसोबत भागीदारी करण्याचा आम्हाला अभिमान आहे." असं सुपरगेमिंगचे सह-संस्थापक आणि सीईओ रॉबी जॉन यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.