Supreme Court Youtube : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'असले' व्हिडिओ होत आहेत शेअर

supreme court youtube channel hacked latest update : सुप्रीम कोर्टाचे अधिकृत यूट्यूब चॅनेल हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
supreme court youtube channel hacked
supreme court youtube channel hackedesakal
Updated on

Supreme Court Latest Update : सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर शुक्रवारी सायबर हल्ला झाला असून, हे अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर कोर्टातील सुनावणींच्या थेट प्रक्षेपणाऐवजी XRP या अमेरिकन कंपनीने विकसित केलेल्या क्रिप्टोकरन्सीची जाहिरात करणारे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले आहेत.

supreme court youtube channel hacked
iPhone 16 Series Sale : आयफोनचा सेल आजपासून सुरू; मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअर्समध्ये खरेदीसाठी झुंबड,काय आहेत iPhone 16 स्पेशल डिस्काउंट ऑफर्स?

हा हल्ला कोर्टाच्या यूट्यूब चॅनेलवर झालेला पहिलाच प्रकार आहे. २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने संविधान पीठांच्या सुनावणींचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला होता. चॅनेलवर “Brad Garlinghouse: Ripple SEC च्या २ बिलियन डॉलरच्या दंडाला उत्तर, XRP किमतीची भविष्यवाणी” अशा शीर्षकाचा व्हिडिओ दिसत होता.

सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेची स्थिती आणि न्यायालयाच्या सायबर सुरक्षेबाबतच्या धोरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.