छत्रपती संभाजीनगर : घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात २५ हजार ग्राहकांनी १०१.१८ मेगावॉट क्षमतेची यंत्रणा बसविल्यामुळे राज्याने शंभर मेगावॉटचा टप्पा पार केला.
केंद्र सरकारतर्फे या योजनेत तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अंशदान मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. राज्यात सौर प्रकल्प बसविणाऱ्या २५ हजार ८६ ग्राहकांना अनुदानाची रक्कम १६० कोटी रुपये थेट ग्राहकांना हस्तांतरित केली जात आहे. राज्यात आतापर्यंत एकूण तीन लाख ५१ हजार ९४२ ग्राहकांची प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या पोर्टलमध्ये नोंदणी झाली आहे. त्यापैकी दोन लाख ३३, हजार ४३१ ग्राहकांनी महावितरण पोर्टलवर अर्ज केला आहे. पंतप्रधानांनी फेब्रुवारीमध्येच दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा (रूफटॉप सोलर) यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात २० लाख घरांवर ‘रूफटॉप सोलार’ यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट आहे. देशाचा हा प्रकल्प ७५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचा आहे.
असे मिळते अंशदान
ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्याने
वीजबिल शून्य होते
शिल्लक वीज महावितरण विकत घेते
निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट
३० हजार रुपये अंशदान दोन किलोवॅटपर्यंत मिळते
तीन किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी
१८ हजार अनुदान मिळते
तीन किलोवॅटपेक्षा मोठ्या यंत्रणेसाठी एकूण ७८ हजारांपर्यंत मर्यादा
महावितरणतर्फे ‘रूफटॉप सोलर’ बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दहा किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- लोकेश चंद्र,
अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.