SUV Car Price : भारतात SUV कारची क्रेझ वाढतेच आहे. मात्र, काही लोक कमी बजेटमुळे एसयूव्ही कार घेण्याचा प्लॅन पुढे ढकलतात. समजा जर तुमचं बजेट 7 लाख रुपये आहे तर निराश होण्याची अजिबात गरज नाही कारण या बजेटमध्ये एकापेक्षा एक SUV कार उपलब्ध आहेत. 7 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची SUV खरेदी करताना तुम्हाला आम्ही दिलेल्या गाड्यांची लिस्ट नक्कीच उपयोगी पडेल.
Nissan Magnite : जपानी कंपनी Nissan Motor ने 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार कनेक्ट, LED हेडलाइट आणि DRLs सह मॅग्नाइट एसयूव्ही रेंज मधील कार बाजारात आणली आहे. गाडीची एक्स-शोरूम किंमत 5.97 लाख रुपयांपासून सुरू होते.
Tata punch : टाटाच्या लोकप्रिय एसयूव्ही पंचमध्ये 7-इंच टचस्क्रीन उपलब्ध आहे. ही SUV 6 स्पीकर हरमन साउंड सिस्टीम आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स देते. गाडीची एक्स-शोरूम किंमत रु. 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
Mahindra KUV100 NXT : महिंद्राची आलिशान SUV 7 इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल्स यासारख्या फीचर्ससह येते. गाडीची एक्स-शोरूम किंमत 6.05 लाख रुपयांपासून सुरू होते.
Renault Triber : ही 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम असलेली 7 सीटर कार आहे. डिजिटल LED इन्स्ट्रुमेंट क्लस्टरने सुसज्ज असलेल्या कारची एक्स-शोरूम किंमत 6.33 लाख रुपयांपासून सुरू होते.
Renault Kiger : 7 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या एसयूव्हीसाठी रेनॉल्ट किगर हा एक चांगला ऑप्शन ठरते. गाडीची एक्स-शोरूम किंमत 6.64 लाख रुपयांपासून सुरू होते. फ्रेंच ऑटो कंपनीने या एसयूव्हीला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.