Student Attendance Bot : विद्यार्थ्यांसाठी अटेंड्स चॅटबॉट बंधनकारक,काय आहे हे नवे तंत्रज्ञान?

Swiftchat based student attendance chatbot : इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अटेंड्स बॉट या ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांना नोंदणी करावी लागणार आहे.
Swiftchat based attendance chatbot
Swiftchat based student attendance chatbotesakal
Updated on

Student attendance chatbot : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्यासाठी स्विफ्टचॅट ॲपद्वारे अटेंडन्स बॉटवर भरणे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांना नोंदणी करावी लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थी उपस्थिती स्विफ्ट चॅट या अप्लिकेशनमधील अटेंडन्स बाँटद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया १ डिसेंबर २०२३ पासून सुरू करायची होती. परंतु, शाळांमध्ये आगोदरच एमडीएम ॲपद्वारे विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवली जात आहे.

Swiftchat based attendance chatbot
Airtel Recharge Plans : एअरटेल धमाका ऑफर! २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत २० पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म्स,बंपर डेटा आणि बरंच काही

त्यामुळे पुन्हा स्विफ्ट चॅट या मोबाइल ॲपवर विद्यार्थ्यांची हजेरी घेणे संयुक्तिक नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. यामुळे एकाच कामात शिक्षकांचा वेळ जाणार आहे; तसेच ग्रामीण व दुर्गम भागात नेटवर्कची मोठ्या प्रमाणात अडचण असते. त्यामुळे पुन्हा स्विफ्ट चॅट ॲपवरून विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी सुरू केल्याने शिक्षकांच्या कामात अजून एका कामाची भर पडली आहे.

Swiftchat based attendance chatbot
Google For India 2024 : दिवाळीआधी भारतासाठी गुगलकडून AIची अनोखी भेट; वार्षिक कार्यक्रमात मोठ्या घोषणांसह काय खास असणार? पाहा

शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी शाळेचा यू-डायस क्रमांक आणि स्वतःचा शालार्थ क्रमांक वापरावा लागेल. जर मोबाइल क्रमांक बदलला असेल, तर तो शालार्थ संकेतस्थळावर अद्ययावत करणे आवश्यक आहे. दोन सत्रांमध्ये चालणाऱ्या शाळांसाठी वेगवेगळ्या वेळांमध्ये उपस्थिती नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा शाळांमध्ये जेथे अनुदानित शिक्षकांची उपलब्धता नसेल, तेथे इतर शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून उपस्थिती नोंदवली जाऊ शकते.

- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.