Swiggy Scam : स्विग्गीवर संतापले ग्राहक; विनाकारण चार्ज करतंय एक्स्ट्रा पैसे! कंपनी म्हणते...

Swiggy Accused : कित्येक लोक एक्स (ट्विटर) वर आपल्या बिलाचा फोटो शेअर करत आहेत.
Swiggy Scam
Swiggy ScameSakal
Updated on

ऑनलाईन फूड डिलिव्हरी अ‍ॅप असणाऱ्या स्विग्गीवर सध्या देशातील बरेच ग्राहक संतापले आहेत. याला कारण म्हणजे, हे अ‍ॅप यूजर्सकडून विनाकारण जास्त पेमेंट घेत आहे. काही यूजर्सने याचे स्क्रीनशॉट एक्स (ट्विटर) या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

kingslyj या एक्स हँडलवरून याबाबत सर्वात आधी माहिती देण्यात आली. स्विग्गी अ‍ॅप हे बिलाच्या रकमेची बेरीज करताना त्यात तीन रुपये जास्त जोडत असल्याचं दिसून आलं आहे. कंपनी बिलाची रक्कम राउंडऑफ करताना आपोआप असं होत असल्याचं या यूजरने म्हटलं आहे. यानंतर इतर काही यूजर्सनी देखील आपल्या बिलाचा स्क्रीनशॉट पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.

कंपनीने दिलं उत्तर

ही समस्या एका टेक्निकल बगमुळे तयार झाली असल्याचं स्विग्गीने म्हटलं आहे. एक्स पोस्टच्या माध्यमातून कंपनीने याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ऑर्डर अमाउंट आणि ऑर्डर हिस्ट्री यामध्ये टेक्निकल बगमुळे फरक दिसतोय. मात्र, आता हा बग दुरूस्त करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

Swiggy Scam
Zomato AI : कायतरी खायचंय, पण काय ते कळत नाही? झोमॅटोचा 'एआय चॅटबॉट' करेल मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()