Swiggy UPI Payment Option Available in App
Swiggy UPI Payment Option Available in Appesakal

Swiggy UPI : खुशखबर! Swiggyमध्ये आला UPI पेमेंटचा पर्याय; कसं वापराल? वाचा एका क्लिकवर

Swiggy UPI Payment Option Available in App : स्विगी वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्विगीच्या ॲपमधून बाहेर न पडता तुम्ही UPI पेमेंट करू शकणार आहात.
Published on

Swiggy UPI Payment : स्विगी वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.आता तुम्ही तुमच्या आवडत्या रेस्टॉरेंटचे जेवण ऑर्डर करताना किंवा Instamart वरून वस्तू मागवताना फक्त 5 सेकंदात यूपीआय पेमेंट करू शकणार आहात. स्विगीने अलीकडेच त्यांच्या ॲपमध्ये NPCIच्या यूपीआय डिजीटल पेमेंट सोल्यूशनचा समावेश केला आहे. यामुळे आता स्विगीच्या ॲपमधून बाहेर न पडता तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकता.

Swiggy UPI ची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या यूपीआय ॲप्सवर जाण्याची गरज नाही. स्विगी ॲपमध्येच आता यूपीआय पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता ऑर्डर करताना पेमेंटसाठी वेगळे ॲप उघडण्याची आणि परत स्विगी ॲपवर येण्याची झंझट मिटली आहे.(How to use Swiggy UPI)

Swiggy UPI Payment Option Available in App
BSNL New Sim Card : घरबसल्या मोबाईलवरून सुरु करा नवीन BSNL सिमकार्ड; काय आहे सोपी प्रोसेस? वाचा एका क्लिकवर

स्विगीच्या या नवीन फीचरमुळे थर्ड-पार्टी यूपीआय ॲप्सवर जाण्याची गरज नाही. जस्टपेडच्या हायपर UPI प्लगइनद्वारे स्विगी ॲपमध्येच यूपीआय पेमेंट करता येणार आहे. भारतात यूपीआय पेमेंट्स झपाट्याने वाढत आहेत. याच वर्षाच्या एप्रिलमध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भारतात सुमारे 131 अब्ज यूपीआय व्यवहार झाले असल्याचे नमूद केले होते.

Swiggy UPI Payment Option Available in App
Sim Card Buying New Rules : सिमकार्ड खरेदीवर निर्बंध; केंद्र शासनाने लागू केला नवा नियम,नेमकं प्रकरण काय?

स्विगी यूपीआय वापरण्यासाठी फक्त एकदाच तुमच्या बँक खात्याशी लिंक करावी लागते. त्यानंतर पुढील प्रत्येक वेळी तुम्हाला फक्त UPI पिन नोंदवावा लागेल. स्विगीने सांगितले की, "यूपीआय पेमेंट करताना अपुऱ्या रकमेची माहिती, चुकीची क्रेडेंशियल्स किंवा तांत्रिक अडचणी असल्यास स्विगी ॲप तुम्हाला त्वरित सूचित करेल. त्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण करू शकता."

Swiggy UPI Payment Option Available in App
Jio Recharge Plans : जिओचा सुपर रिचार्ज प्लॅन! एकदम कमी दरात Amazon Prime सबस्क्रिप्शन; दिवसाला 2GB डेटा अन् चक्क 84 दिवसांची वैधता

UPI पेमेंट्स वाढत असून, जुलै महिन्यात UPI व्यवहाराच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. जुलैमध्ये यूपीआयद्वारे केले गेलेले व्यवहार ₹20.64 लाख कोटी इतके होते, तर जूनमध्ये ही रक्कम ₹20.07 लाख कोटी इतकी होती. तसेच, जुलैमध्ये UPI ट्रान्झाक्शनची संख्या जूनच्या तुलनेत 4% वाढली असून, ती 14.44 अब्ज इतकी झाली आहे.

Swiggy UPI Payment Option Available in App
Redmi New Smartphone : Redmiच्या ब्रँड स्मार्टफोनची भारतात एंट्री; 7000 रुपयांपेक्षा कमी किंमत,फीचर्स अन् कॅमेराही एकदम खास

UPI पेमेंट्स भारतात झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. अलीकडेच जुलैमध्ये यूपीआय व्यवहार 20.64 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे स्विगीने यूपीआय पेमेंट्सचा हा मोठा निर्णय घेणे हा ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर आहे. आता तुम्ही फक्त 5 सेकंदात तुमच्या आवडत्या पदार्थांची ऑर्डर करा आणि स्विगी UPI द्वारे झटपट पेमेंट करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.