Data Privacy: मोबाईलमधला डेटा सुरक्षित ठेवायचा आहे? मग या टिप्स नक्की करा फॉलो

स्मार्टफोनचा डेटा सुरक्षित ठेवणे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.
Data Privacy
Data Privacysakal
Updated on

स्मार्टफोनचा डेटा सुरक्षित ठेवणे आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. खरे तर फोनच्या डेटाच्या चोरीच्या घटना काही काळापासून वाढत आहेत. जेव्हा डेटा चोरीला जातो तेव्हा तुमची सर्व महत्वाची माहिती चुकीच्या हातात जाते. आज आम्ही तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहोत, जे लक्षात ठेवून तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित करू शकता.

फोन डेटा सुरक्षित कसा ठेवायचा?

फोनचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, 'ओके' वर क्लिक करण्यापूर्वी तुम्हाला सर्व माहिती मिळणे सर्वात महत्त्वाचे आहे. अनेक वेळा आपल्या फोनमध्ये किंवा अॅप्स डाउनलोड करताना एक नोटिफिकेशन पॉप अप होते, जी आपण न वाचता ओके करून आपला डेटा आपोआप असुरक्षित बनवतो.

Data Privacy
Online Scam : 'यूट्यूब व्हिडिओ लाईक करुन पैसे कमवा'; १५ हजार भारतीयांची ७०० कोटींना फसवणूक! काय आहे हा स्कॅम?

फोनमध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन स्थापित करा

फोनवरील पासवर्ड प्रमाणे, 2 स्टेप व्हेरिफिकेशन देखील आपला डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करते. ऑनलाइन पेमेंट करताना, आपल्याला अनेकदा 'ऑलवेस ऑस्क्ड फॉर ओटीपी' असा पर्याय येतो. हा पर्याय निवडून कोणीही कधीही OTP शिवाय तुमचे डीटेल्स यूज करू शकणार नाही.

अॅप डाउनलोड करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

आजकाल ऑनलाइन काम करण्याच्या सुविधेमुळे लोकांची खूप सोय झाली आहे. अशा परिस्थितीत आपण कोणत्याही कामासाठी अॅप डाउनलोड करतो आणि आपले काम घरी बसून करतो. मात्र, चुकीचे अॅप डाउनलोड केल्याने तुमचा डेटा ट्रान्सफर होऊ शकतो, हे फार कमी लोकांना माहीत आहे. प्ले स्टोअर वरून नेहमी अॅप डाउनलोड करा आणि डाउनलोड करण्यापूर्वी त्याबद्दल वाचा.

Data Privacy
ISRO : श्रीहरिकोटाहून रविवारी सात उपग्रहांचे प्रक्षेपण; सिंगापूरच्या उपग्रहाचाही समावेश

फ्री वायफाय यूज करणे टाळा

अनेक वेळा लोक कोणत्याही ठिकाणचे फ्री वायफाय वापरतात. असे करणे चुकीचे आहे कारण यामुळे तुमच्या फोनमध्ये केवळ डेटाच नाही तर व्हायरल समस्या देखील उद्भवू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.