Tata Apple Partnership : टाटाने Apple सोबत केली मोठी डील, आता स्वस्त होणार आयफोन?

अशात युजर्सला आयफोन स्वत होणार अशी आशा आहे.
Tata Apple Partnership
Tata Apple Partnershipsakal
Updated on

टाटा वेगवेगळ्या कारणासाठी सतत चर्चेत येत असतो. आता टाटा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. टाटाने Apple फोन प्रेमींना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता टाटा Apple सोबत पार्टनरशिप करत एक मोठा धमाका करणार आहे.

टाटा ग्रुप आता देशात Apple चे एक्सक्लुजीव स्टोर उघडण्याच्या तयारीत आहे. टाटा ग्रुप ने यासाठी मॉल्ससारख्या महागड्या ठिकाणी बोलणी सुरू केली आहे. पण मुळात सर्वसामान्यांचा एकच प्रश्न असणार की आता आयफोन स्वस्त होणार? (Tata Apple Partnership plans to open exclusive Apple stores in India )

टाटा इनफिनिटी रिटेल ब्रांडसोबत Apple चे 100 आउटलेट उघडण्याच्या तयारीत आहे. इनफिनिटी रिटेल आता टाटा ग्रुपच्या इलेक्ट्रॉनिक चेन क्रोमा स्टोरचे कामकाज पाहते. इनफिनिटी रिटेल Apple चा फ्रँचाएजी पार्टनर बनून 500 पासून ते 600 स्क्वेअर फुटच्या100 आउटलेट उघडण्याच्या तयारीत आहे.

स्टोअरबाबत असं बोललं जात आहे की है, स्टोअरमध्ये आयफोन, आयपॅड (iPad) आणि Apple वॉच (Apple Watch) ची विक्री केली जाणार. Apple चे दूसरे फ्लॅग्शिप प्रोडक्टस जसे की मॅकबुकची विक्रीसाठी प्रीमिअम रीसेलर होणे गरजेचे आहे. सोबतच यासाठी स्टोअरचा आकार 1 हजार स्क्वेअर फुटपेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. भारतात सध्या Apple चे 160 पेक्षा जास्त प्रीमिअम रीसेलर आहेत.

Tata Apple Partnership
Tata Group च्या 'या' शेअरने 3 वर्षात 1 लाखाचे केले 40 लाख

टाटा ग्रुप आणि Apple च्या पार्टनरशिपची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा टेक दिग्गज भारतात आपला पहिला फ्लॅग्शिप स्टोर उघडण्याच्या विचारात आहे. कंपनी पुढील वर्षी पहिल्या तीन महिन्यात मुंबईमध्ये आपला पहिला स्टोअर उघडू शकते. टाटा ग्रुपच्या स्पेससाठी देशभरात प्रीमिअम मॉल्स आणि हाय स्ट्रीट्ससोबत बोलणी सुरू आहे.

Apple तमिलनाडु प्लांट प्रोडक्शनमध्ये आपला नशीब अजमावल्यानंतर येथे आयफोन ची विक्रीला सुरवात होणार आहे. अशात युजर्सला आयफोन स्वत होणार अशी आशा आहे. मात्र असे होणे कदाचित कठीण आहे. कारण आयफोनचे पार्ट्स बाहेर देशातून येतात सोबतच यावर वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्सपण लागतो. अशात टाटा ग्रुप आपल्या स्टोर्सची आणि बॅंकांची पार्टनरशिप दाखवत ग्राहकांना ऑफर देऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.