Tata Harrier : टाटा हॅरियरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कारच्या मालकाने ट्विटरवर अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये टाटा मोटर्स, रतन टाटा, नितीन गडकरी यांना टॅग करत त्यांनी लिहिले आहे की, त्यांना कंपनीकडून कोणतीही मदत मिळाली नाही.
मारू गमडू नावाच्या या युजरने पुढे सांगितले की तो टाटा मोटर्सचा चाहता आहे, परंतु या अपघातात तो थोडक्यात बचावला. ट्विटनुसार, कार आणि तिचा विमा दोन्ही टाटा मोटर्सकडून खरेदी करण्यात आले आहेत. ही कार 11 महिन्यांपूर्वी खरेदी केली गेली होती, तर तिचा विमाही काढला होता आणि तिचा EMI ही सुरू होता.
टाटा हॅरियरला आग कशामुळे लागली याचा खुलासा कारच्या मालकाने अद्याप केलेला नाही. मात्र, त्याने शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये एसयूव्हीला आग लागल्याचे दिसत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या मधोमध गाडीला आग लागली.
टाटा मोटर्सची मदत नाही
कारच्या मालकाचा दावा आहे की खराब झालेली टाटा हॅरियर अद्याप दुरुस्त करणे बाकी आहे. टाटा डीलरशीपकडून विमा पॉलिसी घेतल्यानंतरही त्याला क्लेम मिळालेला नाही आणि गाडीची दुरुस्तीही झालेली नाही. जळालेल्या हॅरियरच्या मालकाचा दावा आहे की त्याने कारमध्ये इतर कोणत्याही असेसरिज लावल्या नव्हत्या. गाडी चालवत असताना आग लागल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.