Tata च्या सर्वात स्वस्त SUV ची डिलिव्हरी सुरू; पाहा डिटेल्स

Tata Punch
Tata PunchGoogle
Updated on

टाटा मोटर्सने (Tata Motors)ने नुकतीच दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन बाजारात आपली सर्वात स्वस्त मायक्रो एसयूव्ही टाटा पंच (Tata Punch) लॉन्च केली. अतिशय आकर्षक लुक आणि मजबूत इंजिन क्षमतेने सजलेल्या या एसयूव्हीची किंमत फक्त 5.49 लाख रुपयांपासून सुरु होते. कंपनीने आजपासून त्याची डिलिव्हरीही सुरू केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीसाठी सध्या कोणतीही वेटींग नाही. इच्छुक ग्राहक 21,000 रुपये भरून ही मायक्रो एसयूव्ही बुक करू शकतात. कंपनीने सध्या ही SUV सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च केली आहे, जी केवळ 31 डिसेंबर 2021 पर्यंत लागू असेल, त्यानंतर कंपनी त्याची किंमत वाढवू शकते.

SUV चार वेगवेगळ्या पर्सोना ट्रिम्समध्ये ऑफर केली आहे, ज्यामध्ये प्युअर, अॅडव्हेंचर, अकंप्लिश्ड आणि क्रिएटिव्ह पर्सोना यांचा समावेश आहे. कंपनीने पुण्यातील प्लांटमध्ये या एसयूव्हीची निर्मिती केली आहे. टाटा पंच कंपनीने फक्त एका इंजिन पर्यायासह ऑफर केली असून यामध्ये कंपनीने 3 सिलिंडर असलेले 1.2 लिटर क्षमतेचे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरले आहे. जे 86hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.

Tata Punch
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; एका चार्जमध्ये चालेल 300Km

Tata Punch SUV

टाटा पंच मध्ये, कंपनीने एकापेक्षा जास्त दर्जेदार फीचर्सचा समावेश केला आहे, ज्यामुळे ही कार इतर प्रतिस्पर्धी मॉडेल्सपेक्षा बरेच कित्येक पटीने वरचड ठरते. यामध्ये कंपनीने ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), ISOFIX चाइल्ड सीट अँकर, फ्रंट पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम यांसारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय हरमनची ऑडिओ सिस्टीम आणि 4 स्पीकर, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल मिरर, रिअर पॉवर विंडो, फॉलो मी हेडलॅम्प्स, यूएसबी चार्जिंग सॉकेट, फुल व्हील कव्हर इत्यादी गोष्टी तुम्हाला मिळतील

Tata Punch
Tata Punch चे कोणते व्हेरियंट बसेल तुमच्या बजेटमध्ये? वाचा

देशातील सर्वात स्वस्त सुरक्षित कार

टाटा पंच ही देशातील सर्वात स्वस्त सुरक्षित कार आहे. या मायक्रो एसयूव्हीला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. गेल्या ऑटो एक्स्पो दरम्यान कंपनीने सादर केलेल्या HBX संकल्पना मॉडेलची ही उत्पादन आवृत्ती आहे. जी कंपनीच्या लेटेस्ट डिझाईन 2.0 फिलॉसॉफीवर तयार करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर कंपनीने आपले इतर काही नवीन मॉडेल्सही तयार केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()