टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये धावेल 213 किमी

tata xpres-t-
tata xpres-t-Google
Updated on

टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतीय बाजारात Xpres-T अंतर्गत पहिली इलेक्ट्रिक सेडान लॉन्च केली आहे. कंपनीने या वर्षी जुलै महिन्यात Xpres ब्रँड सादर केला होता, त्यानंतर आता कंपनीने अधिकृतपणे त्यांची इलेक्ट्रिक कार (tata xpres-t electric sedan) लाँच केली आहे. Xpres-T हे टाटा टिगॉर EV चे रीब्रांडेड मॉडेल आहे. FAME सबसिडी अंतर्गत भारतीय बाजारात या Xpres-T EV कारची किंमत 9.54 लाख रुपयांपासून सुरु होते, जी 10.64 लाख रुपयांपर्यंत जाते.

टाटा Xpres-T EV च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ते नुकतेच लॉन्च झालेल्या 2021 Tigor EV सारखे आहे. टाटाच्या या कमर्शियल इलेक्ट्रिक सेडानचे इंटीरियर Tigor EV Ziptron सारखेच आहे ऑल ब्लॅक थीमसह देण्यात आले आहे. कारला सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, हरमन साउंड सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ABS, EBD, इको आणि स्पोर्ट ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत

tata xpres-t-
MG ची पहिली पर्सनल AI असिस्टंट असलेली SUV Astor भारतात लॉंच

भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटार्स ही इलेक्ट्रिक कार टॅक्सी सेगमेंटमध्ये लॉंच केली आहे. यामध्ये इंटरनस कम्बशन इंजिन (ICE) कार आणि इलेक्ट्रिक कार या दोन्हीचा समावेश होतो. ही इलेक्ट्रिक सबकॉम्पॅक्ट सेडान 213 किलोमीटर आणि 165 किलोमीटर (एआरएआय सर्टिफाइड) या दोन श्रेणींमध्ये येते. त्याची 21.5 kWh बॅटरी पॅक 213 किमीची रेंज देतो. तर त्याच वेळी, त्याची 16.5 kWh बॅटरी पॅक 165 किमीची रेंज देतो.

कंपनीच्या दाव्यानुसार, 16.5 kWh बॅटरी पॅक 0-80 टक्के चार्ज होण्यासठी 90 मिनिटे लागतात. त्याच वेळी, 21.5 kWh बॅटरी पॅक 0 ते 80 टक्के चार्ज करण्यासाठी 110 मिनिटे लागतात. ही इलेक्ट्रिक कार सामान्य चार्जर किंवा कोणत्याही 15 ए प्लग पॉईंटच्या मदतीने चार्ज केली जाऊ शकते.

tata xpres-t-
स्वस्तात मिळतात 'या' सनरुफ असलेल्या कार, पाहा किंमत आणि फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()