Tata Motors News : टाटा मोटार्सच्या सर्वच कार महागणार; का, कधी अन् किती होणार वाढ? जाणून घ्या डिटेल्स

tata motors price hike in passenger vehicles segment check all details here
tata motors price hike in passenger vehicles segment check all details here
Updated on

Tata Motors ने 1 फेब्रुवारी 2023 पासून त्यांच्या पॅसेंजर व्हेकल सेगमेंटमधील वाहनांच्या किमती (Tata Motors passenger vehicles price hike) वाढवण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने या दर वाढीचे कारण रेग्युलेटरी बदला बदल आणि एकूण इनपुट खर्चात वाढ असल्याचे म्हटले आहे.

टाटा मोटर्सची दरवाढ कधीपासून आणि किती वाढणार?

टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन सेगमेंटमधील वाहनांच्या वाढलेल्या किमती 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू होतील. वाहनांच्या किमतीत 1.2 टक्के वाढ करण्यात आली असून या वाढलेल्या किमती व्हेरिएंट आणि मॉडेल्सच्या आधारे ठरवल्या जातील.

कंपनीने शुक्रवार, 27 डिसेंबर 2023 रोजी निवेदन जारी करत याबद्दलची माहिती दिली आहे, ज्यामध्ये असेही म्हटले आहे की वास्तविक खर्चात वाढ झाल्यानंतरही कंपनीने ग्राहकांवर कमीत कमी भार टाकला आहे.

tata motors price hike in passenger vehicles segment check all details here
'आज मी माझ्या आईला जग दाखवलं...'; कलियुगातील श्रावण बाळाचं नेटिझन्सकडून कौतुक

टाटा मोटर्सने 2022 मध्येच पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये येणाऱ्या कारच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले होते, ज्यामध्ये कंपनीने इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याचे सांगितले होते. याशिवाय, या वाढीचे आणखी एक कारण म्हणजे प्रदूषणासंबंधीचे नवीन कायदे हे 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार असल्याचे मानले जाते. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने नवीन कायद्यांबाबत केलेल्या अपडेटमुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे, त्यानंतर कंपनीने किमती वाढवण्याचे पाऊल उचलले आहे.

tata motors price hike in passenger vehicles segment check all details here
Mohsin Shaikh Murder Row : 'सरकारने सोयीचे आरोपी शोधले होते'; निर्दोष मुक्ततेनंतर देसाईंची पहिली प्रतिक्रिया

टाटा मोटर्सकडे टिगोर, टियागो अल्ट्रोझ सारख्या कार आहेत, ज्यात पेट्रोलसोबत सीएनजीचा पर्यायही आहे. याशिवाय, कंपनीकडे SUV रेंजमध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यात Tata Punch, Tata Nexon, Tata Harrier आणि Tata Safari सारख्या लोकप्रिय ब्रँडचा समावेश आहे.

tata motors price hike in passenger vehicles segment check all details here
Devendra Fadnvis : 'असं' उलगडणार पहाटेच्या शपथविधीचं रहस्य; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सकडे सर्वाधिक इलेक्ट्रिक कार आहेत, ज्यामुळे कंपनीचे या सेगमेंटमध्ये वर्चस्व कायम आहे. इलेक्ट्रिक कारच्या सध्याच्या रेंजमध्ये, कंपनीकडे टाटा टियागो ईव्ही, टाटा टिगोर ईव्ही, टाटा नेक्सॉन ईव्ही, टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स, टाटा नेक्सॉन ईव्ही प्राइम सारख्या कार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()