Tata EV Cuts Prices : टाटाची कार घेणं झालं स्वस्त! कंपनीने कमी केली दोन गाड्यांची किंमत! आता द्यावे लागणार 'इतके' रुपये

Tata Nexon and Tiago EV Price Cut: इलेक्ट्रिक कार्स बद्दल बोलायचे झाल्यास टाटा मोटर्स सध्या आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते.
Tata EV Cuts Prices
Tata EV Cuts Prices
Updated on

Tata Nexon and Tiago EV Price Cut: इलेक्ट्रिक कार्स बद्दल बोलायचे झाल्यास टाटा मोटर्स सध्या आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Tata Nexon EV, Tata Tiago EV, Tata Tigor आणि Tata Punch EV यांचा समावेश आहे. दरम्यान तुम्ही जर टाटाची इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठीआनंदाची बातमी आहे. आता टाटा कंपनीने त्यांच्या Nexon EV आणि Tiago EV च्या किंमती 1.2 लाख रुपयांनी कमी केल्या आहेत.

टाटा मोटर्सची सब्सिडियरी कंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (TPEM) ने Nexon EV आणि Tiago EV च्या किमतीत कपातीची घोषणा केली आहे. कंपनीने Nexon.ev ची किंमत 1.2 लाख रुपयांपर्यंतची कपात केली आहे. तरTiago.ev ची किंमत 70,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

मात्र नुकत्याच लाँच झालेल्या Punch.EV च्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्या, Nexon.ev ची किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तर लाँग रेंज Nexon.ev (465km) ची किंमत 16.99 लाख रुपयांपासून सुरू होते. सध्या Tiago.ev ची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे.

Tata EV Cuts Prices
Balasaheb Thorat: अशोक चव्हाण गेले आता बाळासाहेब थोरातांकडे महत्त्वाची जबाबदारी; मल्लिकार्जुन खरगेंचा आला फोन

किमतीतील कपातीबद्दल बोलताना, TPEM चे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, बॅटरीचा खर्च हा ईव्हीच्या एकूण खर्चाचा मोठा भाग असतो. बॅटरी सेलच्या किमती अलीकडच्या काळात कमी झाल्या आहेत आणि भविष्यात संभाव्य कपात (किंमतीच) लक्षात घेऊन, आम्ही थेट ग्राहकांना फायदा देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत EVs मध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. देशभरात EVs अधिक एक्सेसेबल बनवून त्यांच्या वापरास चालणा देणे हे आमचे ध्येय आहे. आम्हाला विश्वास आहे की आता (किंमत कमी झाल्यानंतर) Nexon.ev आणि Tiago. ev या कार अधिक ग्राहकांना आकर्षित करतील

Tata EV Cuts Prices
Ashok Chavan Join BJP : अशोक चव्हाणांनी 'पंजा'ची साथ सोडली, पटोलेंना जड जाणार? थोरातांना पुन्हा जबाबदारी मिळणार?

Nexon.evची किंमत 1,20,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, त्यामुळे आता त्याच्या बेस मॉडेलची किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू होते. Tiago. ev ची किंमती 70,000 रुपयांनी कमी झाली आहेत, आता त्याच्या बेस मॉडेलची किंमत आता 7.99 लाख रुपयांपासून सुरू झाली आहे. नवीन किंमती जाणून घेण्यासाठी.

CY2023 मध्ये EV ची ग्रोथ मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे, जी एकूण PV सेगमेंटमध्ये खूपच चांगली पाहायला मिळाली.. पीव्ही इंडस्ट्रीमध्ये 8% वाढ तर ईव्ही सेगमेंट 90% पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. वाढीचा हा वेग CY2024 मध्येही कायम राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.