टाटा मोटर्स (Tata Motors) ने या वर्षी जानेवारीमध्ये आतापर्यंतचा सर्वोत्तम विक्रीचा विक्रम नोंदवला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 50% वाढ नोंदवली आहे. Tata Motors ने जानेवारी 2022 मध्ये एकूण 40,777 प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. त्याच वेळी, कंपनीच्या 2 वाहनांचा टॉप 10 यादीत देखील समावेश झाला या दोन गाड्या म्हणजे टाटा नेक्सॉन (Tata Nexon) आणि टाटा पंच (Tata Punch) या आहेत.
सर्वात स्वस्त एसयूव्हीला मोठी मागणी
टाटा नेक्सॉन ही देशात सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही असताना, टाटा पंचलाही प्रचंड मागणी दिसून आली आहे. Tata Nexon चे गेल्या महिन्यात 13,816 यूनिट्स इतकी विक्री झाली आहे. अशाप्रकारे ही टॉप 10 च्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या यादीत टाटा पंच दहाव्या क्रमांकावर आहे. पंचाने गेल्या महिन्यात 10,027 युनिट्सची विक्री केली. ही छोटी एसयूव्ही लॉन्च होऊन अवघे 5 महिने झाले आहेत.
किंमत फक्त 5.64 लाख रुपयांपासून सुरू
टाटा पंच ही त्याच्या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त SUV आहे. त्याची किंमत 5.64 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.98 लाख रुपयांपर्यंत जाते. निसान मॅग्नाइट आणि रेनॉ किगर सारख्या वाहनांशी या कारची थेट स्पर्धा आहे. Nissan Magnite ची किंमत 5.76 लाख रुपये आणि Renault Chiger ची किंमत 5.79 लाख रुपयांपासून सुरू होते. टाटा पंच एकूण 4 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये Pure, Adventure, Accomplished आणि Creative यांचा समावेश आहे.
इंजिन आणि फीचर्स
Tata ने या कारला Altroz सारखे 1.2-लीटर पेट्रोल इंजिन (86PS/113Nm) दिले आहे जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. टाटा पंचमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन प्रणाली, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटोमॅटिक हेडलाइट्स आणि वायपर्स आणि क्रूझ कंट्रोल मिळते. मात्र, त्यात सनरूफ देण्यात आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.