Nexon EV Facelift : एका कारने दुसरी होईल चार्ज; टाटाच्या नव्या इलेक्ट्रिक नेक्सॉनमध्ये मिळतायत भन्नाट फीचर्स!

Tata Nexon EV : टाटा मोटर्सने आता इलेक्ट्रिक कार सेगमेंटकडे अधिक गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे.
Nexon EV Facelift
Nexon EV FacelifteSakal
Updated on

सध्या इलेक्ट्रिक कार्सची वाढती लोकप्रियता पाहता कित्येक मोठ्या वाहन कंपन्या याकडे वळत आहेत. टाटा मोटर्सनेही आता इलेक्ट्रिक कार सेगमेंटकडे अधिक गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. नवीन नेक्सॉन ईव्हीमध्ये देण्यात आलेल्या फीचर्समधून हे स्पष्ट होत आहे.

टाटाने आपल्या इलेक्ट्रिक नेक्सॉन या एसयूव्हीचं फेसलिफ्ट मॉडेल सादर केलं आहे. यामध्ये कित्येक हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. भारतातील केवळ लग्झरी इलेक्ट्रक गाड्यांमध्ये मिळणारे युनिक फीचर्स आता टाटाच्या या परवडणाऱ्या कारमध्येही मिळत आहेत.

Nexon EV Facelift
Car Offer : एक रुपयाही न भरता मिळेल ही हॅचबॅक कार; दहा हजारांपेक्षा कमी बसेल हप्ता! जाणून घ्या डीटेल्स

फ्युचरिस्टिक लुक

Tata Nexon.ev या कारच्या फेसलिफ्ट मॉडेलला अगदी फ्युचरिस्टिक लुक देण्यात आला आहे. नेक्सॉनच्या नव्या ICE मॉडेलप्रमाणे हा लुक आहे. मात्र, इलेक्ट्रिक कारच्या लुकमध्ये काही बदल दिसून येतो. हा लुक कंपनीच्या कन्सेप्ट कार Curvv सारखा असल्याचं दिसत आहे. हे डिझाईन आणखी एअरोडायनॅमिक आहे, आणि यात नवीन LED लायटिंग देण्यात आलं असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

या कारचा ग्राउंड क्लिअरन्स 208 mm एवढा आहे. Tata Nexon Electric मध्ये ड्युअल टोन पेंट स्कीम दिली आहे. कारच्या वरच्या बाजूला ब्लॅक शेड देण्यात आलेला आहे. या गाडीचं इंटेरिअर पेट्रोल मॉडेलप्रमाणेच आहे. नवीन टच-स्क्रीन सेटअप आणि टू-स्पोक स्टिअरिंग व्हील आहे. नवीन ईव्हीमध्ये डॅशबोर्डवर कमी बटण दिले आहेत, ज्यामुळे हायटेक लुक येतो.

या कारच्या सेंटर कंन्सोलमध्ये रोटरी ड्रायव्हिंग मोड सिलेक्टर दिला आहे. यामुळे ड्रायव्हिंग मोड निवडण्यासाठी रेडिओच्या बटणाप्रमाणे तुम्ही याला फिरवू शकणार आहात. यातील इन्फोटेन्मेंट सिस्टीमला 12.3 इंच स्र्कीन दिली आहे, जी ICE मॉडेलच्या तुलनेत मोठी आहे.

Nexon EV Facelift
Tax on Cars: 3 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळते ही कार, पण तरी बिघडू शकतं तुमचं आर्थिक बजेट, जाणून घ्या कसं!

बॅटरी आणि रेंज

या कारचे मिड रेंज आणि लाँग रेंज असे व्हर्जन लाँच करण्यात आले आहेत. मिड रेंज व्हर्जनची रेंज 325 किलोमीटर एवढी आहे. तर लाँग रेंज व्हर्जन एकदा चार्ज केल्यानंतर 465 किलोमीटर जाऊ शकेल.

दोन्ही व्हेरियंटमधील बॅटरीला IP67 प्रोटेक्शन दिलं आहे. कारसोबत 7.2kW क्षमतेचा AC चार्जर मिळतो. पूर्ण चार्ज होण्यासाठी मिड रेंजच्या व्हर्जनला 4.30 तासांचा वेळ लागतो. तर लाँग रेंजच्या व्हर्जनला 6 तासांचा वेळ लागतो. वेगळा DC चार्जर विकत घेतल्यास हा वेळ आणखी एक तासाने कमी होऊ शकतो.

अ‍ॅडव्हान्स फीचर्स

नेक्सॉन फेसलिफ्ट मॉडेलमध्ये 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, वायरलेस मोबाईल चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर असे फीचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी यात 6 एअरबॅग्स, ईएससी सर्व सीट्ससाठी थ्री-पॉइंट सीटबेल्ट, आयएसओफिक्स आणि इमर्जन्सी ब्रेकडाऊन कॉल असिस्टंट फीचरही यात देण्यात आलं आहे.

तुम्ही Arcade.ev अ‍ॅपच्या मदतीने कारमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म स्ट्रीम करू शकता. सोबतच, यात जेबीएल साऊंड सिस्टीम, व्हॉईस कमांड, सिंगल पॅन सनरूफ, फास्ट चार्जिंग सी-पोर्ट असे फीचरही देण्यात आले आहेत.

Nexon EV Facelift
Green Energy : 'भारत 2030 पूर्वीच गाठणार हरित उर्जेचं लक्ष्य; 2025 पर्यंत इलेक्ट्रिक बॅटरींच्या किंमती घटणार'

युनिक फीचर्स

या कारमध्ये देण्यात आलेले दोन युनिक फीचर्स म्हणजे, अप्लायन्स चार्जिंग आणि व्हीटूव्ही (V2V) चार्जिंग. या कारमध्ये असणाऱ्या व्हेईकल-टू-व्हेईकल चार्जिंग फीचरमुळे तुम्ही एका कारने दुसरी कार चार्ज करू शकाल. तसेच यातील V2L फीचरमुळे तुम्ही कारमधील बॅटरी वापरून तुम्ही इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चार्ज करु शकाल.

बुकिंग आणि किंमत

टाटाच्या या नव्या इलेक्ट्रिक गाडीचं बुकिंग 9 सप्टेंबरपासून सुरू झालं आहे. याची अधिकृत किंमत 14 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या नेक्सॉन इलेक्ट्रिक कारची किंमत 14.49 ते 19.54 लाख यादरम्यान आहे. फेसलिफ्ट मॉडेलची किंमत याहून अधिक असू शकते.

Nexon EV Facelift
Nitin Gadkari: डिझेल कार घेणे होणार महाग, 10 टक्के जीएसटी लावण्याचा नितीन गडकरींचा प्रस्ताव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.