Tata Stryder : टाटाने लाँच केली नवीन इलेक्ट्रिक सायकल; मिळतोय ६ हजारांचा डिस्काउंट, पाहा फीचर्स

दैनंदिन वापरासाठी ही अगदी परफेक्ट सायकल असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Tata Stryder Zeeta Plus
Tata Stryder Zeeta PluseSakal
Updated on

स्ट्रायडर या कंपनीने एक नवीन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. Zeeta Plus नावाची ही इलेक्ट्रिक सायकल आहे. एकदम आकर्षक लुक आणि दमदार बॅटरी असणाऱ्या या सायकवर सध्या मोठा डिस्काउंट मिळत आहे. दैनंदिन वापरासाठी ही अगदी परफेक्ट सायकल असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

"सायकलिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून,देशात पर्यायी मोबिलिटी वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत." असं मत यावेळी कंपनीचे बिझनेस हेड राहुल गुप्ता यांनी व्यक्त केलं. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक सायकलला चार्ज होण्यासाठी अगदी कमी वीज लागणार आहे. यामुळे याची रनिंग कॉस्ट ही केवळ १० पैसे प्रति किलोमीटर एवढी असणार आहे.

Tata Stryder Zeeta Plus
Electric Scooter : ओला, एथर अन् हिरोच्या EVs कडे खरेदीदाराची पाठ! नेमकं का मंदावली इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री?

काय आहेत फीचर्स?

झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलमध्ये उच्च क्षमतेची ३६-व्होल्ट/6 एएच बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी २१६ Wh पॉवर जनरेट करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. स्ट्रायडरच्या झीटा ई-बाईकच्या तुलनेत ही बॅटरी मोठी आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल सुमारे ३० किलोमीटर जाऊ शकते. तसेच, केवळ तीन ते चार तासांमध्ये ही बॅटरी पूर्ण चार्ज होते, अशी माहिती कंपनीने दिली.

कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर धावण्यासाठी ही सायकल योग्य असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. पॅडल न मारता ही सायकल जास्तीत जास्त २५ किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने जाऊ शकते. या सायकलमध्ये ऑटो-कट ब्रेक आणि दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. सायकलच्या हँडल बारवर SOC डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. यावर बॅटरी रेंज, टाईम अशी माहिती दिसते.

Tata Stryder Zeeta Plus
रोज सायकल चालवल्याने पोटाची चरबी होईल गायब, Cycling चे आरोग्यासाठी हे आहेत फायदे

कोणासाठी योग्य?

कंपनी या सायकलच्या बॅटरी पॅक आणि मोटरसाठी २ वर्षांची वॉरंटी देते. तर फ्रेमवर लाईफटाईम वॉरंटी देते. ही सायकल ५.४ फूट ते ६ फूट उंची असणाऱ्या व्यक्तींसाठी अगदी योग्य आहे. तर, याची पॅडल क्षमता १०० किलो एवढी आहे. यामध्ये वॉटर रझिस्टंट बॅटरी देण्यात आली आहे.

किती आहे किंमत?

स्ट्रायडर ही कंपनी टाटा इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीच्या मालकीची आहे. या सायकलची सध्याची किंमत २६,९९५ रुपये एवढी आहे. ही इंट्रोडक्टरी प्राईज असून, भविष्याती सुमारे सहा हजार रुपयांनी ही किंमत वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तुम्ही स्ट्रायडरच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा रिटेल स्टोअरमधून ही सायकल खरेदी करू शकता.

Tata Stryder Zeeta Plus
Electric Highway : भारतात तयार होणार इलेक्ट्रिक हायवे; मेट्रोप्रमाणे बस-ट्रकही धावणार विजेवर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.