तुम्ही टाटा स्काय वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने चॅनल पॅकच्या किमतीत कपात केली आहे. कंपनी आपल्या वापरकर्त्यांना ओव्हर-द-टॉप (OTT) कंटेंटच्या युगात स्वतःशी जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामध्ये ग्राहकांसाठी चॅनेल बुके आणि पॅकची किंमत कमी करत आहे. पण यामध्ये थोडा ट्विस्ट आहे, कारण हे प्रत्येकाच्या बाबतीत घडणार नाही. फक्त निवडक ग्राहकांनाच चॅनल पॅकच्या किमतीत घट पाहायला मिळेल. मग नेमके काय केले जात आहे आणि टाटा प्ले ते कसे सुरु करेल? चला सविस्तर जाणून घेऊया..
टाटा प्ले चॅनल पॅकची किंमत कमी करत आहे, ज्यामुळे 100 रुपयांपर्यंत बचत होईल. ही सर्व्हिस अधिक परवडणारी बनवण्यासाठी, टाटा प्ले वापरकर्त्यांसाठी गेल्या शनिवारपासून चॅनल पॅकच्या किंमती कमी करत आहे. यामुळे ग्राहकांची मासिक 30 ते 100 रुपयांची बचत होणार आहे. खरं तर, ओटीटीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पे-टीव्ही उद्योग अत्यंत संकटात आहे आणि चॅनल बुकेची किंमत कमी झाल्यास याचा फायदा होईल असे टाटा प्लेचे मत आहे. टाटा प्लेचे सध्या 19 मिलियन सक्रिय सब्सस्क्रायबर्स आहेत.
टाटा प्लेचे व्यवस्थापकीय संचालक हरित नागपाल यांनी ET ला सांगितले की, आज अधिक लोक त्यांच्या प्लॅन्स वाढवण्याएवजी कमी करत आहेत. अशा प्रकारे, कंपनी निवडक वापरकर्त्यांसाठी बुके, पॅक आणि चॅनेलची किंमत कमी करणे अशा ऑफर्स देईल. ज्यामुळे या वापरकर्त्यांना अधिक रिचार्ज करण्यास भाग पाडले जाईल.
नागपाल म्हणाले की, हे अचानक घडत नाही. वापरकर्त्यांसाठी किंमतीतील बदल त्यांच्या यूजेस हिस्ट्री पाहून त्या आधारावर केले जातील आणि त्यांच्या बुकेतून फक्त तेच चॅनेल/पॅक काढले जातील जे ते वापरत नाहीत. यामुळे या वापरकर्त्यांना ज्या सर्व्हिसेस खरोखर पाहायच्या आहेत त्यासाठीच पैसे द्यावे लागतील, यामुळे परिणामी बचत होईल. पे-टीव्ही इंडस्ट्रीचा चर्न रेट दर महिन्याला वाढत असताना टाटा प्लेची ही चांगली कल्पना ठरु शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.