नवी दिल्ली : टाटा मोटर्सची (Tata Motors)नवीन मायक्रो एसयूव्ही टाटा पंचला (Tata Punch) भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कार लाँच होताच अनेकांनी ती खरेदी केली. तिला कंपनीच्या पोर्टफोलिओत टाटा नेक्साॅन (Tata Nexon) नंतर स्थान दिले गेले आहे. टाटा पंचला कंपनीने ५.९४ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले होते. तिच्या अॅडव्हेन्चर ट्रिम लेव्हलची किंमत ६.३९ लाख रुपये, अकम्प्लिश्ट ट्रिम लेव्हलची किंमत ७.४९ लाख रुपये आणि क्रेटिव्ह ट्रिम लेव्हलची किंमत ८.४९ लाख रुपये आहे. लाँच झाल्यावर १२ दिवसांत ही कार कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार बनली आहे. ती कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात छोटी स्पोर्ट्स युटिलिटी वाहन आहे. या कारचे टाॅप स्पेक व्हेरियंटची किंमत ९.०९ लाख रुपये आहे.
टाटा पंच कंपनीची अल्फा प्लॅटफाॅर्मवर आधारित असून तिच्यावर टाटा अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅकही बनवले गेले होते. यात १.२ लीटरचे सिलिंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन लावण्यात आले आहे. जे ८५ बीएचपीपर्यंत पाॅवर आणि ११ एनएम टाॅर्क जेनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशन ऑप्शनविषयी बोलाल तर ती पाच स्पीड मॅन्युअल आणि एटीएमसह सादर करण्यात आली आहे. टाटा पंचची मोठ्या प्रमाणावर बुकिंग झालेली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.