Bharat NCAP 5 Star Rating : स्वदेशी कार सुरक्षा रेटिंग भारत-एनकॅप अंतर्गत फाईव्ह स्टार रेटिंग मिळवण्याची पहिली संधी टाटाने पटकावली आहे. टाटा मोटर्सच्या सफारी आणि हॅरियर या एसयूव्ही गाड्यांना Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये सर्वात सुरक्षित रेटिंग मिळाले आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली.
विशेष म्हणजे या दोन गाड्यांना ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्येही 5 स्टार रेटिंग मिळाले होते. या दोन्ही गाड्यांना नुकतंच अपग्रेड करण्यात आलं आहे. यात मेकॅनिकल आणि कॉस्मेटिक अपडेट्स देण्यात आले आहेत. (Global NCAP Rating)
टाटा हॅरिअर (Tata Harrier Crash Test) आणि सफारी या गाड्यांना अडल्ट सेफ्टी टेस्टमध्ये 32 पैकी 30.08 गुण मिळाले. तर चाईल्ड सेफ्टी टेस्टमध्ये 49 पैकी 44.54 गुण मिळाले. या गाड्यांमध्ये 7 एअरबॅग देण्यात आले आहेत. यातील 6 एअरबॅग्स या ग्लोबल सेफ्टी स्टँडर्डनुसार देण्यात आल्या आहेत. (Tata Safari Crash Test)
टाटा हॅरियरची किंमत (Tata Harrier Price) 15.49 लाख ते 26.44 लाख रुपयांदरम्यान आहे. तर सफारीची किंमत 16.19 ते 27.34 लाख रुपयांदरम्यान आहे. या किंमती एक्स शोरुम आहेत. या दोन्ही गाड्यांमध्ये 2.0 लीटर डिझेल इंजिन देण्यात आलं आहे.
या गाड्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, थ्री-पॉइंट सीटबेल्ट, सर्व प्रवाशांसाठी सीटबेल्ट रिमाईंडर, ISOFIX चाईल्ड सीट माउंट, रिट्रॅक्टर, प्रीटेन्शनर, लोड लिमिटर असणारे सीटबेल्ट आणि अँकर प्रिटेन्शनर असे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. (Tata Safety Features)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.