टाटाची 'ही' कार केवळ 1100 रुपयांत धावेल एक हजार किमी; सोमवारपासून बुकिंग

tata tiago
tata tiago
Updated on

नवी दिल्ली - टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV चे बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कंपनीने या कारबाबत अनेक दावे केले आहेत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, टाटा मोटर्स या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.

tata tiago
Facebook च्या 10 लाख यूजर्सचा डेटा चोरीला; लगेच बदला तुमचा पासवर्ड

Tiago EV ही Tata Motors ची तिसरी इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये आधीच Nexon EV आणि Tigor EV यांचा समावेश आहे. कंपनीने Tiago EV सह इलेक्ट्रिक हॅचबॅक सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे.

टाटा मोटर्सने Tiago EV च्या ड्रायव्हिंग किमतीबाबत मोठा दावा केला आहे. पेट्रोल कारच्या तुलनेत या कारमुळे 6.5 रुपये प्रति किलोमीटर वाचू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. यासाठी कंपनीने तुलनात्मक डेटाही सादर केला.

टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही याच श्रेणीची पेट्रोल कार चालवली तर हजार किलोमीटर चालवण्यासाठी तुम्हाला 7,500 रुपयांचे इंधन लागले. त्याच वेळी, Tiago EV 1000 किमी चालवण्याची केवळ 1,100 रुपये खर्च येईल. त्यामुळे Tiago EV तुम्ही 6,500 रुपये वाचवू शकता.

Tiago EV चे बुकिंग 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. ग्राहक कोणत्याही अधिकृत टाटा मोटर्स डीलरशिप किंवा वेबसाइटवर 21,000 रुपयांची टोकन रक्कम जमा करून Tiago Electric बुक करू शकतात. या कारची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल. Tiago EV डिसेंबरपासून टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध होईल. Tiago EV Ziptron तंत्रज्ञानावर आधारित आहे. Tata Tiago EV ची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपयांपर्यंत असेल.

tata tiago
Facebook च्या 10 लाख यूजर्सचा डेटा चोरीला; लगेच बदला तुमचा पासवर्ड

ग्राहकांच्या विविध गरजा समजून घेऊन, Tiago EV मध्ये IP67 रेटेड बॅटरी पॅक आणि 24kWh बॅटरी पॅकसह अनेक चार्जिंग पर्याय देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की Tiago EV मध्ये 24kWh बॅटरी पॅकसह 315 किमीची रेंज असेल. टाटा मोटर्सने 19.2kWh च्या बॅटरी पॅकसह Tiago EV देखील सादर केली आहे. या बॅटरी पॅकसह कारची रेंज 250 किमी असल्याचे सांगितले जाते. कंपनीने सांगितले की, मोटर आणि बॅटरी 8 वर्षे किंवा 1,60,000 किलोमीटरच्या वॉरंटीसह येतील.

कारचे दोन्ही बॅटरी पॅक जलद चार्जिंग करण्यास सक्षम आहेत. DC फास्ट चार्जर वापरून सुमारे 57 मिनिटांत 80 टक्के पर्यंत चार्ज केले जाऊ शकतात. हे हिल स्टार्ट आणि डिसेंट असिस्ट, टीपीएमएस, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि मल्टी-मोड रीजन फीचरसह देखील दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.