टाटाच्या 'या' कार्सवर मिळतोय जबरदस्त डिस्कांउट; पाहा डिटेल्स

tata
tata
Updated on

टाटा मोटर्सने डिसेंबर महिन्यात त्यांच्या पॅसेंजर मॉडेल रेंजवर मोठ्या प्रमाणात डिस्कांउट जाहीर केला आहे. तुम्ही या ऑफरचा लाभ कॅश डिसकाऊंट, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी डिस्काउंटच्या स्वरूपात घेऊ शकता.

कंपनी ही ऑफर त्यांच्या Tiago, Nexon, Harrier आणि Safari या कारवर देत आहे. जसे की कंपनी Tiago च्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारवर तुम्हाला 10,000 चा डिस्काउंट आणि 20,000 चे एक्सचेंज बोनस देत आहे. तसेच, XT आणि XT(O) ट्रिमसाठी 10,000 चा डिस्काउंट आणि 15,000 चे एक्सचेंज बोनस देत आहे. याशिवाय, कंपनी्च्या या कॉम्पॅक्ट सेडानवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट देखील दिला जात आहे.

Nexon कॉम्पॅक्ट SUV च्या डार्क एडिशन रेंज वगळता सर्व डिझेल व्हेरियंटवर Rs 15,000 चा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

Harrier आणि Safari SUV बद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला या महिन्यात 20000 रुपयांच्या एक्सचेंज बोनसवर Harrier Dark रेंज मिळू शकते. याशिवाय, इतर व्हेरियंटवर तुम्हाला 40000 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटचा लाभ मिळू शकतो. कंपनी तुम्हाला Safari वर 40000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. मात्र, त्याच्या गोल्ड एडिशनवर कोणतीही ऑफर असणार नाही. तुम्ही फक्त 31 डिसेंबर 2021 पर्यंत या सर्व ऑफरचा लाभ घेऊ शकता. अधिक तपशीलांसाठी तुमच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधा.

tata
Jio vs Airtel vs VI: 84 दिवसांचा कोणाचा प्लॅन आहे सर्वात स्वस्त?

याशिवाय Hyundai त्यांच्या कार i10 Nios, Santro, i20 आणि Hyundai Aura या कारवर डिस्काउंट ऑफर मिळत आहे.

Aura

Hyundai Aura च्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर 50000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळत आहे. ही कॉम्पॅक्ट सेडान दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल मॉडेल 1.2-लीटर आणि 1.0-लीटर टर्बो GDi इंजिन ऑप्शनसह उपलब्ध आहे, तर डिझेल प्रकारात 1.2-लीटर CRDi इंजिन आहे. याशिवाय ह्युंदाई ऑरा ही सीएनजी ऑप्शनसह उपलब्ध आहे.

Grand i10 Nios

तुम्हाला Grand i10 Nios च्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर 50000 रुपयांपर्यंतचा लाभ देखील मिळत आहेत. Grand i10 Nios 1.2-लीटर आणि 1.0-लीटर टर्बो GDi आणि डिझेल व्हर्जनमध्ये 1.2-लीटर CRDi इंजिनसह Aura सारख्या 2 पेट्रोल इंजिन ऑप्शन देखील येते.यामध्ये हॅचबॅक सीएनजी मॉडेल देखील येते.

tata
सर्वात स्वस्त मिळणारे देशातील टॉप 5 स्मार्टफोन्स; बघा फीचर्स

Hyundai Santro

Santro हे Hyundai चे एंट्री-लेव्हल मॉडेल आहे, ज्यावर तुम्हाला कंपनीकडून डिसेंबरमध्ये 40000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. Hyundai Santro 1.1-litre Epsilon MPI पेट्रोल इंजिनसह पाच-स्पीड मॅन्युअल आणि AMT दोन्ही ऑप्शनमध्ये येते. याशिवाय, हे सीएनजीचा ऑप्शन देखील उपलब्ध आहे.

Hyundai i20

i20 ही Hyundai ची प्रीमियम हॅचबॅक कार आहे. याच्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटवर 40000 रुपयांपर्यंत फायदा मिळत आहे. पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये 1.2-लिटर आणि 1.0-लिटर टर्बो असून डिझेल मॉडेल 1.5-लिटर इंजिनसह येते आणि व्हेरिएंट आणि व्हेरिएंट ऑप्शननुसार i20 मॅन्युअल, IVT आणि 7DCT पर्यायांमध्ये असू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()