केवळ ६३ हजारांमध्ये खरेदी करा Tata Tiago,जाणून घ्या तपशील

हॅचबॅक सेगमेंटमधील एक लोकप्रिय कार म्हणजे टाटा टियागो
Tata Tiago XT Limited Edition
Tata Tiago XT Limited Edition esakal
Updated on

नवी दिल्ली : हॅचबॅक सेगमेंट कार सेक्टरमधील सर्वाधिक पसंत केला जाणारा सेगमेंट आहे. त्यामुळे उपलब्ध कारमध्ये कमी किंमतीत लांब मायलेज आणि प्रिमियम फिचर्स असतात. आम्ही बोलतोय हॅचबॅक सेगमेंटची एक लोकप्रिय कार टाटा (Tata) टियागोविषयी. ती कंपनीची बेस्ट सेलिंग कार आहे. ती आपल्या कमी किंमतीमुळे पसंत केली जाते. जर तुम्ही टाटा टियागो (Tata Tiago) खरेदी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ४.९९ लाख रुपयांपासून ७.०७ लाख रुपये खर्च करावे लागेल. मात्र येथे तुम्हाला सांगितलेला प्लॅन फाॅलो केल्यास ही कार सहज डाऊन पेमेंट घरी घेऊन जाऊ शकता. कार सेक्टरची माहिती देणारी वेबसाईट CARDEKHO वर दिले गेलेले डाऊन पेमेंट आणि ईएमआयचा हिशेब केल्यास जर तुम्ही ही टाटा टियागोचे एक्सटी लिमिटेड एडिशन खरेदी केल्यास कंपनीशी संबंधित बँक या कारवर ५ लाख ७१ हजार ७० रुपये कर्ज देईल.(Tata Tiago XT Limited Edition Buy With Rupees 63 Thousand 507 Down Payment)

Tata Tiago XT Limited Edition
रुबाबदार Yezdi च्या तीन बाईक्स भारतात लाँच, जाणून किंमती अन् फिचर्स

या कर्जावर तुम्हाला ६३ हजार ५०७ रुपये कमाल डाऊन पेमेंट द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला १२ हजार ७७ रुपये ईएमआय भरावा लागेल. टाटा टियागोवर बँकच्या वतीने मिळणाऱ्या या कर्जाची मुदत बँक ६० महिन्यापर्यंत निश्चित केली गेली आहे. या कर्जाच्या रक्कमेवर बँक ९.८ टक्के वार्षिक दराने व्याज घेईल. जर तुम्ही ही सदरील कार डाऊन पेमेंट प्लॅन वाचल्यानंतर खरेदी करु इच्छित असाल तर आता जाणून घ्या तिचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनचे पूर्ण तपशील...

Tata Tiago XT Limited Edition
Tata च्या दमदार SUV चं नवं एडिशन; लुक असा की प्रेमात पडाल

टाटा टियागोच्या इंजिन आणि पाॅवरविषयी बोलाल तर यात ११९९ सीसीचे इंजिन दिले गेले आहे. जे १.२ लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ८६ पीएसचे पाॅवर आणि ११३ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. त्याबरोबर ५ स्पीड मॅन्युएल ट्रान्समिशन दिले गेले आहे. टाटा टियागोच्या फिचर्स पाहिल्यास यात ७ इंचाचे टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम दिले गेले आहे. जे अँड्राॅईड ऑटो आणि अॅपल कार प्लेची कनेक्टिव्हिटीवाला आहे. या व्यतिरिक्त यात ८ स्पिकर्स साऊंड सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, कूल्ड ग्लोव बाॅक्स, एबीएस, ईबीडी, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग सारखे फिचर्स दिले गेले आहेत. मायलेजबाबत टाटा मोटर्सचा दावा आहे की टाटा टियागो २३.८४ किलोमीटर प्रतिलीटर इतके मायलेज देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()