Tata Group : गुजरातमध्ये उभारणार देशातील पहिला लिथियम-आयन बॅटरी प्लान्ट; टाटाने केला १३,००० कोटींचा करार

यामुळे सुमारे १३ हजार व्यक्तींना नोकरी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.
Tata Group lithium-ion plant
Tata Group lithium-ion plantEsakal
Updated on

देशातील पहिला लिथियम-आयन बॅटरी बनवणारा प्रकल्प (Lithium-ion Cell Plant) गुजरातमध्ये उभारण्यात येत आहे. यासाठी टाटा ग्रुपने गुजरात सरकारशी १३ हजार कोटींचा करार केला आहे. राज्य सरकारने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. २०३० सालापर्यंत राज्यात ५० टक्के कार्बन इमिशन-फ्री एनर्जी आणि १०० टक्के इलेक्ट्रॉनिक व्हेईकल अ‍ॅडॉप्शनचं लक्ष्य गुजरात सरकारने ठेवलं आहे. हा प्रकल्प त्यासाठी पूरक असणार आहे.

अग्रतास एनर्जी स्टोरेज सोल्यूशनने शुक्रवारी राज्य सरकारसोबत नवीन इलेक्ट्रॉनिक पॉलिसी अंतर्गत एक सामंजस्य करार केला. ही मोठी फॅक्टरी उभारण्यासाठी हा करार पाया ठरणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अग्रतास एनर्जी ही टाटा ग्रुपच्या मालकीची कंपनी आहे.

नोकऱ्या होणार उपलब्ध

20 गिगावॅट एवढी एनर्जी तयार करण्याची या प्लांटची क्षमता असेल. यासाठी सुमारे १३ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये बॅटरी उत्पादनाची परिसंस्था तयार करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती सरकारने दिली. या प्लांटमुळे (Tata Lithium-ion Battery plant) सुमारे १३ हजार व्यक्तींना नोकरी उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं जातंय.

Tata Group lithium-ion plant
Tata Group: टाटांचा जलवा! मुकेश अंबानींच्या रिलायन्सला मागे टाकत टीसीएस देशात नंबर वन

गुजरात सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे सचिव विजय नेहरा, आणि अग्रतास एनर्जीचे सीईओ राकेश रंजन या दोघांनी या करारावर स्वाक्षरी केली. "या फॅक्टरीसाठी सरकारचा संपूर्ण पाठिंबा राहील. ही फॅक्टरी पूर्णपणे लिथियम-आयन सेल बनवण्यासाठी समर्पित असेल. ईव्ही बॅटऱ्यांच्या उत्पादनासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे." अशी माहिती मुख्यमंत्री पटेल यांनी दिली.

सध्या भारतात चीन आणि कोरियामधून बॅटरी सेल आयात करण्यात येतात. गुजरात पूर्णपणे यावर अवलंबून आहे. मात्र, या फॅक्टरीच्या स्थापनेनंतर गुजरात बॅटरी सेलच्या बाबतीत आत्मनिर्भर होईल.

Tata Group lithium-ion plant
SDB : आता मुंबईतील डायमंड मार्केटही गुजरातला जाणार? सूरत डायमंड बोर्सची हिरे व्यापाऱ्यांना बंपर ऑफर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()