Tech Hacks : फोनवर ठीकाय, पण लॅपटॉपवर कसा घ्याल स्क्रीनशॉट? एकदम सोपी आहे आयडिया, जाणून घ्या

लॅपटॉपवर स्क्रीनशॉट घेण्याची पद्धत ही मोबाईलपेक्षाही सोपी आहे.
Laptop Screenshot
Laptop ScreenshotEsakal
Updated on

स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 'स्क्रीनशॉट' हा फोल्डर असतोच. स्क्रीनवरील एखादी गोष्ट पटकन सेव्ह करायची असेल, तर आपण त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो. हेच स्क्रीनशॉट कित्येक वेळा एखाद्या गोष्टीचा पुरावा म्हणूनही कामी येतात. मोबाईलवर स्क्रीनशॉट घेण्याची पद्धत तुम्हाला माहिती असेल, मात्र जर तुमच्या लॅपटॉपवर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर?

बरेच लोक लॅपटॉपच्या स्क्रीनवरील एखादी गोष्ट सेव्ह करण्यासाठी, मोबाईलने लॅपटॉप स्क्रीनचा फोटो घेतात. तुम्हीदेखील असंच करत असाल, तर थोडं थांबा. कारण आम्ही तुम्हाला लॅपटॉपचा स्क्रीनशॉट घेण्याची सोपी पद्धत (How to take screenshot in laptop) सांगणार आहोत.

मोबाईलपेक्षा सोपी पद्धत

खरंतर लॅपटॉपवर स्क्रीनशॉट घेण्याची पद्धत ही मोबाईलपेक्षाही सोपी आहे. मोबाईलवर स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरून तीन बोटं खाली स्वाईप करावी लागतात. किंवा मग, पॉवर बटण आणि व्हॉल्यूम डाऊन बटण एकाच वेळी दाबून ठेवावं लागतं. मात्र, लॅपटॉपवर ही प्रक्रिया आणखी सोपी आहे.

अशा प्रकारे घ्या स्क्रीनशॉट

लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्हाला विंडोज आणि प्रिंट स्क्रीन (Windows+PrtSc) ही बटणं एकत्र दाबायची आहेत. यानंतर संपूर्ण स्क्रीनचा एक फोटो तुमच्या पिक्चर्स फोल्डरमध्ये आपोआप सेव्ह होईल.

Laptop Screenshot
Laptop For Students: ऑनलाइन शिक्षण वाढले आहे, मुलांना लॅपटॉपची गरज आहे... कोणता घ्यावा?

एका बटणानेही होईल काम

केवळ प्रिंट स्क्रीन हे बटण दाबूनही तुम्ही तुमच्या पीसीच्या संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट (Screenshot on Laptop) घेऊ शकता. मात्र, यानंतर हा फोटो आपोआप सेव्ह होणार नाही, तर पेंट किंवा तत्सम सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला तो पेस्ट करावा लागेल.

मॅकबुक साठी वेगळी पद्धत

जर तुम्ही अ‍ॅपलचे मॅकबुक (How to take screenshot in Macbook) वापरत असाल, तर स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्हाला कमांड, शिफ्ट आणि ३ (Command+Shift+3) ही बटणं एकत्र प्रेस करावी लागतील. यावेळी तुमच्या पीसीमधून कॅमेऱ्याने फोटो काढल्याप्रमाणे आवाजही येईल, आणि स्क्रीनशॉट कॅप्चर होईल.

Laptop Screenshot
Mobile Hacks: आता मित्रांशी फोनवर बोला फ्री मध्ये, ना इंटरनेट लागणार ना रिचार्ज!

मॅकबुकमध्ये जर तुम्ही कमांड, शिफ्ट आणि ४ (Command+Shift+4) ही बटणं एकत्र दाबली, तर तुम्ही डिस्प्लेच्या काही भागाचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ही बटणं दाबल्यानंतर स्क्रीनवर एक बॉक्स तयार होईल, जो ड्रॅग करून तुम्ही आवश्यक तेवढा भाग बॉक्समध्ये घेऊ शकता. यामुळे तुम्हाला स्क्रीनशॉट घेतल्या नंतर फोटो वेगळा क्रॉप करण्याची गरज भासणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()