Tech Hiring: वित्तीय वर्ष २०२४ मध्ये आयटी टेक क्षेत्रात फक्त १.५५ लाख फ्रेशर्सना संधी मिळणार आहे. २०२३ मध्ये हा आकडा २.३ लाख होता. अशी माहिती टेक स्टाफिंग & सोल्यूशन्स प्रदाता फर्म टीमलीज डिजिटलच्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे. हा अहवाल वर्ष २०२४ मधील नवीन आयटी/इंजिनियरिंग पदवीधरांच्या भरतीच्या दृष्टिकोनावर आधारित आहे.
जवळपास १५ लाख अभियांत्रिकी पदवीधर IT/Tech क्षेत्रात जॉबच्या शोधात आहेत. अहवालाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की सध्या केवळ ४५ टक्के अर्जदार चांगल्या प्रवीणतेच्या अपेक्षांची पूर्तता करतात, ज्यामुळे कौशल्याची वाढती तफावत दिसून येते. अशा परिस्थितीत फ्रेशर्सच्या भरतीचे प्रमाण खूपच कमी आहे.
TeamLease Digital च्या सर्वेक्षणानुसार, केवळ ४५ टक्के उमेदवार आवश्यक कौशल्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात. यावरून कौशल्याची मागणी आणि पुरवठा यांच्यातील प्रचंड तफावतही दिसून येते. बर्याच मोठ्या आयटी कंपन्यांनी सध्या फ्रेशर्सची भरती थांबवली आहे, ज्यामुळे पर्यायी क्षेत्रांमध्ये मागणी वाढली आहे.
नोकऱ्यांच्या वातावरणात मोठा बदल होत आहे आणि BFSI, कम्युनिकेशन, मीडिया आणि टेक्नॉलॉजी, रिटेल आणि कंझ्युमर बिझनेस, लाइफ सायन्सेस आणि हेल्थकेअर, इंजिनिअरिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि एनर्जी आणि रिसोर्सेस यांसारख्या नॉन-टेक सेक्टरमध्ये एंट्री-लेव्हल नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. (Latest Marathi News)
मार्केटच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अधिक चांगली कौशल्ये आणि प्रशिक्षण शक्य तितक्या लवकर प्रदान करणे आवश्यक आहे. म्हणून विविध उद्योगातील दिग्गज लोक सॉफ्ट आणि हार्ड कौशल्ये एकत्र करण्यावर भर देत आहेत. ज्यामध्ये संवाद, टीमवर्क, भावनिक बुद्धिमत्ता, समस्या हाताळणे इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये सॉफ्ट स्किल्स, तांत्रिक कौशल्य, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डेटा अॅनालिटिक्स सारख्या कठीण कौशल्यांचा देखील समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.