Tech layoffs in March 2024 : वर्षाच्या तिसऱ्या महिन्यातही लेऑफचा ट्रेंड कायम; जगभरातील टेक कंपन्यांकडून मोठी कर्मचारी कपात

Layoffs in March : कित्येक टेक कंपन्यांनी कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती केली होती. मात्र, आता सामान्यांचा ऑनलाईन गोष्टींकडील कल कमी होत असल्यामुळे कंपन्या या कामगारांना कमी करत आहेत.
Tech layoffs in 2024
Tech layoffs in 2024eSakal
Updated on

Tech Layoffs : 2024 या वर्षाच्या सुरूवातीपासूनच जगभरातील कितीतरी टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली होती. हाच ट्रेंड मार्चमध्येही कायम राहिला. या महिन्यात अ‍ॅपल, डेल, आयबीएम, एरिक्सन अशा कित्येक टेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं. बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना यंदा पगारवाढ देणार नसल्याचंही घोषित केलं आहे.

येणाऱ्या आर्थिक मंदीच्या लाटेला तोंड देण्यासाठी कंपन्या हे पाऊल उचलत असल्याचं म्हटलं जात आहे. कित्येक टेक कंपन्यांनी कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती केली होती. मात्र, आता सामान्यांचा ऑनलाईन गोष्टींकडील कल कमी होत असल्यामुळे कंपन्या या कामगारांना कमी करत आहेत.

एरिक्सन

स्विडिश टेलिकॉम कंपनी एरिक्सनने (Ericsson Layoffs) गेल्या वर्षी 8,500 कामगारांना काढून टाकलं होतं. यानंतर यावर्षी 25 मार्च रोजी कंपनीने आणखी 1,200 कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे. 5G नेटवर्क इक्विपमेंटची मागणी घटल्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉस्ट कटिंग म्हणून एरिक्सनने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.

Tech layoffs in 2024
Air India Layoffs: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; इतक्या कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

डेल

डेल टेक्नॉलॉजीस कंपनीने देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात (Dell Layoffs) केली आहे. डेलच्या पर्सनल कॉम्प्युटर विक्रीमध्ये 11 टक्के ड्रॉप दिसून आला आहे. यामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्चमध्ये कंपनीत सुमारे सहा हजार कर्मचारी कमी असल्याचं एका रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अ‍ॅपल

अ‍ॅपलने या महिन्यात आपले दोन महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट बंद झाल्याची घोषणा केली. अ‍ॅपल कार (Apple Car) डिव्हिजन बंद केल्यानंतर त्यातील कर्मचाऱ्यांना अ‍ॅपल एआय डिव्हिजनला शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर अ‍ॅपलने मायक्रो एलईडी डिस्प्ले प्रोजेक्टही (Apple Micro LED Display) बंद केला आहे. यामुळे या प्रकल्पातील सुमारे 100 कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे. यातील काही कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात शिफ्ट करण्यात येण्याची शक्यता आहे. (Apple Layoffs)

Tech layoffs in 2024
Paytm Layoffs: आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम घेणार मोठा निर्णय; हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी

आयबीएम

सीएनबीसीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, आयबीएम कंपनी मोठ्या प्रमाणात लेऑफच्या तयारीत आहे. 'वर्कफोर्स रिबॅलिन्सिंग' करण्यासाठी कंपनीने गेल्या वर्षीच मोठ्या लेऑफची (IBM Layoffs) घोषणा केली होती. सुमारे 8,000 कर्मचाऱ्यांची जागा एआय घेणार असल्याचं काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं. 12 मार्च रोजी आयबीएमने काही कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली. मात्र, 2024 च्या शेवटीपर्यंत आम्ही मोठ्या प्रमाणात भरती देखील करू असंही कंपनीने म्हटलं आहे.

इतर कंपन्यांचाही समावेश

कॅनडामधील टेलिकम्युनिकेशन कंपनी 'बेल'ने अवघ्या 10 मिनिटांच्या व्हर्चुअल ग्रुप मीटिंगमध्ये 400 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची (Bell Layoff) घोषणा केली. प्लॅजेरिजम डिटेक्शन फर्म टुर्निटिनने आपल्या इंजिनिअर्सपैकी 20% कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सुमारे 219 टेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीची (Tech Layoffs) घोषणा केली आहे. यामुळे जगभरातील 50 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.