Param Rudra Supercomputers : PM मोदींनी लॉन्च केलेले सुपर कॉम्प्युटर्स का आहेत खास? जाणून घ्या सर्वकाही

Supercomputer Speed च्या मदतीने कसा मोजला जातो वेग? ते आपल्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?
Param Rudra Supercomputers
Param Rudra Supercomputersesakal
Updated on

Param Rudra Supercomputers :

पीएम मोदींनी आज तीन Param Rudra Supercomputers लॉन्च केले आहेत. हे तिन्ही सुपरकॉम्प्युटर नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत 130 कोटी रुपये खर्चून भारतात तयार करण्यात आले आहेत. हे तीन संगणक पुणे, कोलकाता आणि दिल्ली येथे वैज्ञानिक संसाधने, अवकाश संशोधन, विज्ञान आणि आरोग्य सेवा क्षेत्रासाठी तैनात करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन Param Rudra Supercomputers लॉन्च केले आहेत. आज आम्ही तुम्हाला सुपर कॉम्प्युटर म्हणजे काय आणि त्यांचा वेग कसा मोजला जातो याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. तसेच, या सुपर कॉम्प्युटरचे फायदे तोटे काय आहेत याबद्दलही माहिती घेऊयात.

Param Rudra Supercomputers
Food-Tech Startup : ऑनलाइन फूड डिलिव्हरीतून घरच्या जेवणाचा स्वाद

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, परम रुद्र सुपरकॉम्प्युटर्स आणि HPC टेक्नॉलॉजीसह भारत संगणकीय क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशनसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) यांच्यात सहयोगाने काम करण्यात आले आहे.

पुढे ते म्हणाल की, या मोहिमेचा उद्देश संपूर्ण भारतामध्ये प्रगत संगणकीय प्रणालीचे जाळे निर्माण करणे हा आहे. सुपर कॉम्प्युटर अधिक Storage आणि Fast Input-Outputs यासारख्या सुविधा देतात. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत नाही, त्यामुळे भारताचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

Param Rudra Supercomputers
Tech layoffs in March 2024 : वर्षाच्या तिसऱ्या महिन्यातही लेऑफचा ट्रेंड कायम; जगभरातील टेक कंपन्यांकडून मोठी कर्मचारी कपात

Param Rudra Supercomputers काय आहेत? (What Is Param Rudra Supercomputers)

सुपर कॉम्प्युटर ही शक्तिशाली High Performance टेक्नॉलॉजी आहे. जी हाय स्पीडने डेटा आणि जटिल गणनांवर प्रक्रिया करतात. जेव्हा सिस्टममध्ये अनेक प्रोसेसर एकमेकांशी जोडलेले असतात, तेव्हा त्या सिस्टमला सुपर म्हणतात. प्रोसेसरच्या मजबूत क्षमतेमुळे, कोणताही संगणक क्षणार्धात आपले काम अगदी सहजपणे करू शकतो.

Supercomputer Speed Measure: कसा मोजला जातो वेग?

सुपर कॉम्प्युटरचा वेग फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स प्रति सेकंद (FLOPS) मध्ये मोजला जातो. तुमच्या सामान्य संगणकांच्या तुलनेत, सुपरकॉम्प्युटर जास्त महाग आहेत डिसेंबर 2023 पर्यंत, Frontier supercomputer हे जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटरचे नाव धारण करेल.

ही सुपर कॉम्प्युटर Cray EX वर आधारित प्रणाली आहे, ज्याचा वेग Rmax 1.102 exaFLOPS म्हणजेच एका सेकंदात 1.102 क्विंटिलियन फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स आहे.

सध्या भारतातील सुपर कॉम्प्युटर 12 किलोमीटरच्या रिझोल्यूशनसह हवामानाचा अंदाज लावतात. आणि नवीन सुपर कॉम्प्युटर 6 किमी रिझोल्यूशनसह तेच करेल.

काय आहेत सुपर कॉम्प्युटर्सचे फायदे? (Super Computer Benefits)

हाय स्पीड - सुपरकॉम्प्युटरमधील प्रोसेसर आणि इतर भागांमुळे, या प्रणाली जटिल गणना खूप लवकर सोडविण्यास सक्षम आहेत जी आपला सामान्य संगणक करू शकत नाही.

अधिक मेमरी - सामान्य संगणकांच्या तुलनेत, सुपर कॉम्प्युटरमध्ये अधिक मेमरी असते, ज्यामुळे या प्रणाली मोठ्या प्रमाणावर डेटा संग्रहित आणि प्रक्रिया करण्यास सक्षम असतात.

मल्टी-प्रोसेसिंग - सुपर कॉम्प्युटरमध्ये एक नाही तर अनेक प्रोसेसर बसवले जातात, जे मल्टी-टास्किंगमध्ये मदत करतात.

Param Rudra Supercomputers
Tech Tips : आला आला उन्हाळा, एसीच्या वाढत्या बिलाला घाला आळा; या ट्रिक्स येतील कामी

काय आहेत सुपर कॉम्प्युटर्सचे तोटे?

खर्च - सुपर कॉम्प्युटर तयार करणे आणि त्याची देखभाल करणे यासाठी खूप जास्त खर्च येतो, त्यामुळे केवळ मोठ्या संस्था किंवा सरकार हे संगणक खरेदी करू शकतात.

ऊर्जेचा अधिक वापर - सामान्य संगणकांच्या तुलनेत, सुपर कॉम्प्युटर मोठ्या प्रमाणात वीज वापरतात.

जास्त जागा लागते - सामान्य संगणक कमी जागेत बसतात परंतु सुपर कॉम्प्युटरचा आकार खूप मोठा असतो, ज्यामुळे या प्रणाली स्थापित करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.